Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रभात दूध डेरीजवळ भीषण अपघात २ ठार


दोघेही श्रीरामपूर बस डेपोचे सहाय्यक आधिक्षक व सहाय्यक निरिक्षक परिवहन महामंडळ कर्मचारी
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीरामपूर- संगमनेर रस्यावर प्रभात दूध डेरी जवळ दुचाकी व ट्रक यांच्यात आज सायंकाळी ५ :३०च्या दरम्यान भीषण अपघात होऊन या अपघातात २ जणांचा मृत्यु झाला आहे.
याबाबत घटनास्थळी समजलेल्या माहिती वरुन बाळासाहेब यशवंत कोते (शिर्डी ) व अनिल निकम (कोपरगाव ) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजले आहे . दोघेही श्रीरामपूर बस डेपोचे सहाय्यक आधिक्षक व सहाय्यक निरिक्षक परिवहन महामंडळ कर्मचारी असल्याचे समजते. अपघात ग्रस्त ट्रक मध्ये लोखंडी सळया असल्याचे समजले आहे.
प्रभात दूध डेअरी जवळील माहेश्वरी स्टील समोर झालेल्या ट्रक व मोटरसायकल अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याचे समजते. आज दि.११ मे रोजी सायं.५:३० वा. सदरचा अपघात झाल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments