Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फिजिकल डिस्टेंस ठेवून महात्मा दिनानिमित्त अभिवादन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
राहुरी महात्मा फुले विद्यापीठ- ११ में १८८८ रोजी जोतिराव फुले यांना मुंबईतील कोळीवाडा येथे दुसरे समाज सुधारक राव बहादुर वडेकर, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर यंदे, तेलगू नेते स्वामी रमय्या वैकंय्या आय्यावारु,मोरो विठ्ठल वाळवेकर, यांच्या पुढाकाराने रघुनाथ महाराज सभागृहात सोहळा आयोजित करून अठरापगड जाती जमातीच्या साक्षीने जोतिराव फुले यांचा सत्कार करून 'महात्मा' पदवी असलेले मानपत्र अर्पण केले, हा दिवस महात्मा दिन म्हणून भारतात साजरा केला जातो.
या महात्मा दिनाच्या अनुषंगाने श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य वतीने महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही महात्मा दिनानिमित्त महात्मा फुलेंना अभिवादन करण्याबरोबरच महात्मा फुले लिखित *शेतकर्याचा असुड', 'गुलामगिरी,, 'छत्रपती शिवरायांचा पोवाडा', 'ब्राह्मणाचे कसब', आदी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे महात्मा दिनानिमित्त *श्री संत सावता माळी युवक संघाच्या* वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भाऊसाहेब गुलदगड म्हणाले की, महात्मा फुलेंनी समाजा- समाजातील अंतर (सोशल डिस्टन्स) दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आणि आज 11 मे 2020त कोरोना मुळे (कोविड १९) फिजिकल डिस्टन्स ठेवून महात्मा दिन साजरा करावा लागत आहे.
याप्रसंगी संघाचे राज्य सचिव सुनिल गुलदगड.सल्लागार अजिंक्य मेहेत्रे.मा जिल्हाध्यक्ष जिवन गुलदगड.राहुरी शहराध्यक्ष रोहित टेंभे. सुरक्षा अधिकारी शेटे व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अजिंक्य मेहेत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
पुढे बोलताना गुलदगड यांनी देशवासीयांना महात्मा दिनाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी पोलिस कर्मचारी, डॉक्टर,साफसफाई कर्मचारी, यांना सेनिटाइजरचे वाटप केले.

Post a Comment

0 Comments