Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रियकाराच्या मदतीने पतीचा काढला काटा !


दिल्लीच्या अशोक विहारमधील
   धक्कादायक घटना
आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / क्राईम
दिल्ली : प्रेमसंबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचा पत्नीने प्रियकाराच्या मदतीने तोंड दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील अशोक विहारमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी खाक्या दाखविताच पत्नीने गुन्हा कबुल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मयत पतीचा अंत्यसंस्करासाठी जात असताना पोलिसांनी कोरोनाच्या पाश्वभूमीवर अंत्यसंस्कार थांबवले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या तपासणीमध्ये श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याचा स्पष्ट अहवाल प्राप्त झाला. ही घटना उत्तरपूर्व दिल्लीतील अशोक विहारमध्ये घडली. ३५ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. इतक्यावरच न थांबता जगावर आलेल्या कोरून संकटाचा तिने फायदा घेत करोना व्हायरसमुळे पतीचा मृत्यू झाला, असे भासविण्याचा प्रयत्नही तिने केला. पण मयत पतीवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु होती, या दरम्यान, स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले. मयत पतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यातून श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. 
शरत दास (४५) असे मयताचे नाव असून तो दुकानदार होता. त्याच्या पत्नीचे नाव अनिता दास. २ मे रोजी सकाळी उठल्यानंतर अनिताने शेजाऱ्यांना आपले पती बेशुद्ध पडले आहे. कुठलीही हालचाल करत नाही, असं सांगण्यास सुरुवात केली होती. परंतु तिने कोरोना व्हायरसमुळे पतीचा मृत्यू झाल्याचा शक्यता असल्याचं सांगत होती. या घटनेनंतर खबरदारी म्हणून शेजाऱ्यांनी त्वरित पोलिसांना सांगितले. 
दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर अनिताकडे चौकशी केली. अनिता पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. शरत दास आजारी नव्हते, त्यांची प्रकृती उत्तम होती, असे शेजाऱ्यांच्यानी पोलिसांना माहिती दिली. कोरोनाच्या तपासणीबाबत पोलिसांनी अहवाल दाखवा, असे सांगितले. पण त्यावेळी अनिताकडे कोणतेही कागदपत्र मिळून आले नाही. ४ मे रोजी शरत दास यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतरच्या तपासणी अहवालात शरत दास यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिताला अधिक चौकशीसाठी बोलावले. या दरम्यान, पोलिसांनी पत्नी अनिता हिला पोलीस खाक्या दाखविताच, आपले दुसऱ्या एका व्यक्तीवर प्रेम आहे. पती हा अडथळा ठरत असल्याने त्याला दूर करण्यासाठी व नवऱ्यापासून सुटका करुन घेण्यासाठी हत्या केल्याचे तिने कबूल केले. मयत शरतला अनिताच्या प्रेमसंबंधांची माहिती होती. यावरुन त्यांच्या दोघात नेहमी भांडणे होत होती. त्यामुळे पत्नी अनिता व प्रियकर यांनी त्याला ठार मारण्याचे नियोजन केले. त्यानुसार १ मे रोजी रात्री शरत हा झोपत असताना तिने प्रियकर संजय याला घरी बोलावून घेतले. यानंतर दोघांनी ब्लॅंकेटच्या मदतीने गळा आवळून पती शरतची हत्या केल्याची कबुली पत्नी अनिता हिने दिली.

Post a Comment

0 Comments