Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेशनकार्ड नसणाऱ्यांना धान्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे काम युद्धपातळीवर सुरू : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
वर्धा, दि 15 :- हातावर पोट असणा-या मात्र रेशनकार्ड नसणाऱ्या गरजूना धान्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या परिस्थितीत कुणीही उपाशी राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. कुठे त्रुटी राहिल्या असतील तर त्या लक्षात आणून द्याव्यात. त्या प्रामाणिकपणे दूर करण्याचा शासन निश्चितच प्रयास करणार आहे, अशी प्रतिक्रिया नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 
वर्धा शहराला लागून असलेल्या उमरी मेघे मधील शांतीनगर येथील रामदास व बेबी मडावी या गरीब कुटुंबाला धान्य व किराणा असलेली कीट त्यांनी उपलब्ध करून दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समावेश नसलेल्या केशरी रेशनकार्ड धारकांना राज्य शासन स्वस्त धान्य योजनेअंतर्गत धान्य पोहोचवत आहे. रेशनकार्ड नसणा-या कुटुंबाला तात्पुरत्या स्वरूपात कुपन देण्यात येत आहे. या वस्ती मधील ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशा 175 कुटुंबांना तात्पुरते रेशन कुपन देण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांना सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात कूपन उपलब्ध करून देण्याच्या सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत असे श्री तनपुरे यांनी सांगितले. 
यावेळी त्यांनी भेट दिलेल्या कुटुंबियांची विचारपूस केली. तसेच ग्रामपंचायत सदस्यांना गावातील रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांची यादी तयार करण्यास सांगितले. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना पक्षाच्या वतीने धान्य पुरवठा व किराणा उपलब्ध करून देण्याचा सूचनाही त्यांनी दिल्यात.

Post a Comment

0 Comments