Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शंभुसेना संघटनेची किल्ले धर्मवीरगडावर वृक्ष संवर्धन मोहीम... प्रति झाडास एक जार पाणी..


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीगोंदा : उन्हाळ्याची तीव्र दाहकता व सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडावरील (बहादूरगड) वृक्षांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन, प्रति झाडास २० लिटर म्हणजेच एक जार पाणी देत शंभुसेना संघटनेच्या वतीने झाडांना पाणी घालुन वृक्ष संर्वधन करण्यात आले.
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले धर्मवीरगडावर (बहादूरगड) विविध माध्यमांद्वारे दरवर्षी वृक्षांची लागवड केली जाते व त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो, तरी देखील उन्हाळ्यात सर्व झाडांचे संवर्धन करणे खूपच जिकिरीचे होते, यामुळे सर्व माध्यमे आप-आपल्या परीने संवर्धनाचे प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणून शंभुसेना सामाजिक संघटनेच्या वतीने ऐन उन्हाळ्यासह लॉकडाऊन काळात मोहिमेतील सबंधितांनी सुरक्षित अंतर ठेवून वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.
पेडगाव किल्ल्यावरील वृक्ष संवर्धन मोहिमे प्रसंगी झाडांभोवतीचे गवत काढुन, झाडांना आळी करत प्रति झाड एक जार म्हणचे २० लिटर पाणी घालुन वृक्ष संवर्धन केले.या सामाजिक कार्यात शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपक राजेशिर्के, प्राध्यापक शिवाजी क्षिरसागर सर , लक्ष्मीकांत राजेशिर्के, श्यामकुमार काराळे सर ,परशुराम खळदकर, नवनाथ क्षिरसागर , तेजस काराळे , प्रणव क्षिरसागर आदी सहभागी होते.

Post a Comment

0 Comments