Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीत अत्यावश्यक दुकानासहित काही दुकानेस ९ ते २ या वेळेसाठी उघडण्यास परवानगी


आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / राजेंद्र गडकरी
शिर्डी : देशात कोरोनाचे रुग्ण सापडत असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शासनाने 18 मे पासून ते 31 मे पर्यंत लॉक डॉऊनचा चौथा टप्पा जाहीर केला आहे. त्यामुळे आज 18 मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा राज्यात व शिर्डीतही सुरू झाला आहे. या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला असलातरी मात्र या चौथ्या टप्प्यात थोडीशी ढिलाई आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सर्व मंदिरे बंद असणार आहेत, शिर्डीचेही श्री साईबाबा मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच हॉल, मॉल्स ,करमणुकीचे ठिकाणे हेही बंद राहणार आहेत, मात्र अत्यावश्यक दुकानासहित काही दुकानेस,९ते२या काही वेळेसाठी उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. नुकतीच शिर्डीच्या व्हीआयपी शासकीय गेस्ट हाउसमध्ये आ.विखे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक होऊन तसा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शिर्डी व परिसरात पहिल्यांदाच आज सकाळी काही दुकाने उघडण्यात आली होती. तसेच ग्राहक व नागरिकही बऱ्याच दिवसातून आज शहरात रस्त्यांवर दिसून येत होते. दरवर्षी शिर्डीत सुट्ट्यांमुळे मे महिन्यात मोठी साई भक्तांची गर्दी होत असते, मे महिन्यात येथे मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते, मात्र।सध्या लॉकडाउनमुळे येथे सर्वकाही ठप्प झाले आहे, लॉकडाउनचा चौथा टप्पा महाराष्ट्रात सुरू झाला असला तरी काही शिथिलता देण्यात आली आहे. काही दुकाने उघडण्यास परवानगी काही वेळेसाठी देण्यात आली आहे, मात्र लॉज ,हॉटेल ,सलून ,मॉल्स आदी दुकानांना उघडण्यास परवानगी नाही ते बंदच होती, तसेच शिर्डीत आर्थिक मोठी उलाढाल असणारे हॉटेल रेस्टॉरंट लॉज हार प्रसादाची दुकाने हे मात्रहोती, साई मंदिर बंद असल्यामुळे साईभक्त येत नाही तोपर्यंत ते उडूनही उपयोग नाही त्यामुळे अनेक दुकाने बंद होती हॉटेल्स लॉज बंद आहेत,, मात्र ज्यांनापरवानगी आहे असे काही आज सकाळी दुकाने उघडली होती, प्रथमच शिर्डीची दुकाने उघडल्याचे दिसून येत होते ,तसेच शिर्डीकरही आज बऱ्याच दिवसातून आपल्या घराबाहेर शहरात खरेदी करण्याच्या बहाण्यानेबाहेर पडल्याचे दिसून येत होते. शांत शांत वाटणारी दोन महिन्यातील शिर्डी आज थोडीशी गजबजलेली वाटू लागल्याचे जाणवत होते. मात्र प्रत्येक जण कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंन्स व मास्क यांचे नियम पाळताना दिसत होता, अनेक दिवसा नंतर घरात असणारे शिर्डी व परिसरातील नागरिक साईभक्त हे मंदिर परिसरात येऊन लांबून श्रीसाई स्वर्ण मंदिर कळसाचे दर्शन घेत होते, कारण 17 मार्चला दुपारी तीन वाजता साई भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले होते व ते अजूनही बंद आहे. त्यामुळे लांबुनच मंदिर कळसाचे दर्शन घेता येत आहे व खरेदीच्या निमित्ताने बाहेर आलेले नागरिक लांबूनच खरेदी करता करता श्री साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत आहेत. तर काही दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने एकमेकांशी बऱ्याच दिवसातून भेट झाल्यामुळे गप्पा मारताना दिसत होते, लोक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात थोडीशी तील का ठेवण्यात आली असली तरी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. अनेक नागरिक विनाकारण काहीतरी खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तसेच ओळखीचे कोणी भेटल्यानंतर रस्त्यातच गप्पा मारीत असतात मात्र कायद्याने असे करण्यास बंदी आहे संचारबंदी जारी आहे. चार ते पाच लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. शिर्डी व राहता तालुका अद्याप कोरोणा मुक्त आहे, मात्र लॉकडाऊनचे नियम जर चौथ्या टप्प्यात नागरिकांनी पाळले नाही ,तर शिर्डीत काही अनर्थ होऊ शकतो. त्यासाठी शहरातील नागरिकांनी स्वतःहून काटेकोर नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच मुंबई-पुणे-नाशिक तसेच इतर शहरातून गुपचूप रात्रीच्यावेळी ग्रामीण भागात किंवा शहरात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस चौथ्या टप्प्यात वाढत आहे. या बाहेरून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. तसेच त्यांची माहिती स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे,. शिर्डी भविष्यातही कोरोनामुक्त राहावी यासाठी सर्व शिर्डीकर यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आता सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे. दुकानदारांनी आपली दुकाने उघडली असली तरी आपली दुकाने वेळच उघडी ठेवावी, तसेच सेनेटायझर व मास्क वापरावे, ग्राहकांनाही मास्क असल्याशिवाय कोणतीही वस्तू देऊ नये, सोशल डिस्टंन्स पाळणे महत्त्वाचे आहे, असेही बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments