Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाला घालवण्यासाठी ११जूनला जगभर साईसच्चरि्त्राचे होणार वाचन


शिरडीतून १४मेला प्रारंभ
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / राजेंद्र गडकरी
शिर्डी : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनाशी लढणा्रया प्रशासनातील योध्दे, पोलीस, डॉक्टर, नर्सेस,सफाई कामगार, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे मनापासून आभार मानण्यासाठी, तसेच कोरोना विषाणूचा संपूर्ण जगातून लवकरात लवकर नायनाट व्हावा यासाठी साईबाबांकडे साकडे घालण्यासाठी सामुहिक पध्दतीने साईबाबांकडे प्रार्थना करून साई निर्माण ग्रुप शिर्डी व साई संदेश प्रतिष्ठान रुई, द्वारकामाई प्रतिष्ठाण शिर्डी यांच्या माध्यमातून येत्या गुरुवारपासून एकाच वेळी शिरडीतील प्रत्येक घरात सामूहिक साईसच्चरित्र वाचन करून गुरूवार दु.12 ची आरती सहकुटुंब घरी करून आपआपल्या देवघरात साईबाबांच्या नावाचा सामूहिक गजर करण्यात येणार आहे ,व कोरोना हरवण्यासाठी बाबाना विनतीं करण्यात येणारआहे, प्रत्येकाने या साईचरित्राचे अध्याय वाचन स्वतः किंवा घरातील सदस्यांनी घरीच करायचे आहे ,त्यासाठी श्री साई निर्माण ग्रुपच्या माध्यमातून गुरुवारी 14 मे रोजी श्री साईसच्चरित्र ग्रंथाच्या सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले असुन या पारायण सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या साई भक्तांनी नोंदणी केल्यानंतर सर्व भक्तांना लकी ड्रा द्वारे अध्याय नंबर दिले जाणार आहेत,बुधवारी संध्याकाळी सहभागी झालेल्या भक्तांची नावे आणि साई कृपेने त्यांना मिळालेले अध्याय यांची यादी ग्रुपवर प्रसिद्ध केली जाईल,
सामुहिक अध्याय वाचनाची रूपरेषा.हीअशी ऱाहाणारअसुन सकाळी 11वा. स्तवन मंजिरी वाचनास सुरुवात करून आपल्याला मिळाल्याल्या अध्यायाच्या वाचनास सुरुवात करून दु.12 वाजता सहकुटुं पाच गुरूवार करायचे आहे, या गुरूवारी शिरडीतून या साईसच्चरित्र पारायणास सुरूवात होणारअसुन, त्यानंतर पुढील गुरूवारी 21 मे रोजी राहाता तालुका, 28 मे रोजी अहमदनगर जिल्हा, 4 जून रोजी संपूर्ण भारत देश, व पाचव्या गुरुवारी 11 जूनला संबंध जगात साईसच्चरित्राचे वाचन हे साईभक्त करणार आहेत. गाव तेथे पारायण ,त्यानतरं हा पर्थम व भव्यअसा धामि्रक उपक्रम ठरणार आहे, .तरी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा ,असे आवाहन साईं निर्माण ग्रुप व द्वारकामाई प्रतिष्ठानकडुन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments