Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हर्षिता जयंत गायकवाड ची शासन आयोजित कोवीड-19 जनजागृती स्पर्धांमध्ये विक्रमी कामगिरी; शिर्डीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले कौतुक

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
शिर्डी दि.११ - महाराष्ट्र सरकार तर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी या लॉकडाऊन काळात आयोजित निबंध, कविता,रांगोळी, हस्ताक्षर, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेतील सर्वाधिक बक्षिसे पटकावित विक्रमी कामगिरी केल्याबद्दल राहाता येथील शारदा कन्या विद्या मंदिर ची विद्यार्थिनी हर्षिता जयंत गायकवाड हिचे शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आणि गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांनी आज शिर्डी येथे सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देवून कौतुक केले.


कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर उच्छाद मांडलेला असताना नागरिकांच्या बचावासाठी केंद्राबरोबरच महाराष्ट्र शासनाने युद्ध पातळीवर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी तसेच शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आणि गटशिक्षण अधिकारी पोपट काळे यांनी या काळात कोवीड-19चे संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती कामी निबंध, रांगोळी, हस्ताक्षर, चित्रकला, कविता आणि घोषवाक्य या विषयांवर स्पर्धा आयोजित केल्या विविध गटात इयत्ता पहिले ते बारावीचे विद्यार्थी यात 'कॉम्पिटिशन फ्रॉम होम' द्वारे सहभागी झाले होते. हर्षिताने या सहा प्रकारांपैकी हस्ताक्षर, रांगोळी, निबंध, कविता लेखन या स्पर्धा प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला तर घोषवाक्य या स्पर्धेत द्वितीय आली. पाच पारितोषिके जिंकून हर्षिता या संपूर्ण स्पर्धेत अव्वल ठरली आहे. तर हर्षल राहुल पुरी याने प्राथमिक गटात चार तर प्रांजल विवेक गिरीने दोन स्पर्धाप्रकारात विविध पारितोषिके जिंकली आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेल्या या अभिनव स्पर्धा यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांचे मार्गदर्शनात शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांचेसह विविध शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी परिश्रम घेतले.
शिर्डी उपविभागीय कार्यालयांतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साईबाबा मंदिर, विमानतळ, रेल्वे स्टेशन आदी सर्वाधिक वर्दळीचा भाग असतानाही राहाता तालुका 'कोरोना मुक्त' राखण्यात येथील अभ्यासू व कर्तव्यदक्ष तहसीलदार कुंदन हिरे तसेच सर्व विभागातील अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोवीड-19चे संक्रमण रोखण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांमधे या विविध स्पर्धेमुळे जागरूकता निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. याबाबतीत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हर्षिता गायकवाड हिने यापूर्वीही तिला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळालेल्या बक्षिसांची रक्कम रुपये साडेतीन हजार कोरोना महामारी आपत्तीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली होती. हर्षिता ही ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयंत गायकवाड व शिक्षिका सौ. निता गायकवाड यांची कन्या आहे.

Post a Comment

0 Comments