Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गांजा विक्री करणारा अटक ; शिर्डी पोलिसांची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - येथे कालिकानगरात राहत्या घरामध्ये गांजा विक्री करणारा पोलिसांनी पकडला.२ किलो ८०० ग्रॅम वजनाचा २८ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.गफुर जमुददीन शेख (वय ७० रा , कालीकानगर, ता . राहाता) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, उपविभागिय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांन , शिडी शहरातील सौदडीबाबा रोड , कालिकानगर शिर्डी येथे गफुर जेमुददीन शेख (रा. कालीकानगर, ता. राहाता) हा त्याचे राहाते घरामध्ये गांजा विक्री करत आहे, अशी गोपनिय माहिती मिळाली होती. सदर माहिती प्रमाणे सौंदडीबाबा रोड , कालिकानग , शिर्डी , ता . राहाता येथे तात्काळ पथक पाठवून खात्री करुन तात्काळ कारवाई करा, असे आदेश शिर्डी पोलिसांना दिले. सपोनि दिपक गंधाले, सपोनि मिथुन घुगे , सपोनि प्रविण दातरे , पोना पी . डी . अंधारे , पोना बो . वाय . सातपुते, पोना गणेश सोनवणे , पोना गडाख, चालक पोना बी. एस. वर्ष , चालक पोकॉ डी . आर . गांगुडे , पोशि गजानन गायकवाड, पोशि फिरोज पटेल , पोशि सचिन पगारे मपोकॉ एस . आर . भारमल असे पंचांसह योग्य ती साहित्य साधने घेऊन बातमीप्रमाणे खात्री करणे कामी रवाना होऊन सदर इसमाच्या घरी शोध घेतला असता इसम नाम गफुर जमुददीन शेख हा त्याचे राहते घरी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करतांना मिळून आला. त्याचे राहते घराची झडती घेतली असता त्याचे कन्नामध्ये एकूण २ किलो ८०० ग्रॅम वजनाचा २८ हजार रुपये किंमतीचा गांजा मिळून आला. सदर गांजा जागेवर पंचासमक्ष सिल करुन त्याचेकडे सदर गांजा त्याने कोठून आणला आहे. याबाबत विचारणा केली असता त्याने त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरुन त्यास जागेवर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणुन त्याने बेकायदेशिर पणे शिडी शहरामध्ये विक्री करण्याचे उद्देशाने गांजा बाळगला म्हणुन त्याविरुध्द शिर्डी पोलीस स्टेशनला सपोनि मिथुन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन काल दि. ८ मे रोजी शिर्डी पोलीस स्टेशन गुरन २८० / २०२० गुगीकारक औषधीद्रव्य प्रतिबंधक अधि . १९८५ चे कलम २० ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता, त्याची न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी दिला. सदर गुन्हयाचा तपास सपोनि प्रविण दातरे हे करीत आहेत. 
पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग , अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, सहा . पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते , पोना पी. डी. अंधारे , पोना बी.वाय. सातपुते , पोना गणेश सोनवणे, पोना संदिप गडाख , चालक पोना बी. ए. वपे , चालक पोका डी. आर. गांगुडे , पोशि गजानन गायकवाड, पोशि फिरोज पटेल, पोशि सचिन पगारे, मपोकॉ एस.आर. भारमल यांचेसह पथकाने केली आहे. 

Post a Comment

0 Comments