Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी, जवळवाडी गावांना पाण्याचे टँकर मंजूर ; अँँड.प्रताप ढाकणे यांच्या पाठपुराव्याला यश


आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी : तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद गटातील भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या भारजवाडी व जवळवाडी या दोन्ही टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्याकडून मंजूर करण्यात आले आहेत. केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड.प्रताप ढाकणे व भालगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या प्रभावती ढाकणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद गटातील भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या भारजवाडी व जवळवाडी या दोन गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासत होती. याबाबत संबंधित गावातील नागरिकांनी पाण्याची समस्या प्रभावती ढाकणे यांना सांगितली होती.त्यानंतर तात्काळ ढाकणे यांनी पुढाकार घेऊन टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीत दाखल करण्याकामी संबंधित ग्रामसेवकांना आदेश दिले.यानंतर संबंधित गावांचे प्रस्ताव तालुकास्तरावर आल्यानंतर केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड.प्रताप ढाकणे यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकाण व तहसीलदार नामदेव पाटील यांच्या संबंधित गावातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती.यानंतर प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी भारजवाडी व जवळवाडी या दोन गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर केल्याबाबत आदेश काढले आहेत.यामध्ये भारजवाडी साठी एक खेप तर जवळवाडी साठी दोन खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, टँकर चालू झाल्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबणार आहे.दोन्ही गावातील नागरिकांनी अॅड.प्रताप ढाकणे व प्रभावती ढाकणे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments