Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ बीएसएनएलचा टावर नादुरुस्त ; संपर्क होत नसल्याच्या सूचनेने नागरिक त्रस्त

बीएसएनएल टावरची तातडीने
 दुरुस्ती व्हावी, नागरिकांची मागणी
आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी : कोरोनाच्या पाश्वभूमीवर सुरु असणाऱ्या लाँकडाऊनमध्ये गेल्या पाच ते सात दिवसांपासून बीएसएनएल टावर अचानक नादुरुस्त झाल्याने ग्राहकांचा संपर्क होत नसल्याची सूचना कानी पडत आहेत. यामुळे अनेक बीएसएनएल ग्राहकांचा एकमेकांशी संपर्क होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. बीएसएनएल कार्यालयाच्या प्रमुखांनी तातडीने चिंचपूर पांगुळ बीएसएनएल टावर तातडीने दुरुस्ती करुन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी चिंचपूर पांगुळ, चिंचपूर इजदे,वडगाव यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.

अनेक खाजगी भ्रमणध्वनी कंपन्या असतानाही बीएसएनएल या देशाच्या दूरसंचार निगम प्रणालीवर नागरिकांना मोठी विश्वासर्हता आहे. यामध्येच चिंचपूर पांगुळ पंचक्रोशीतील नागरिकांनी बीएसएनएल भ्रमणध्वनी या शासकीय सुविधेचा मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. या दरम्यान, परंतु अचानक बीएसएनएल टाँवर नादुरुस्त झाल्याने पाच ते सात दिवसांपासून बीएसएनएल भ्रमणध्वनी संपर्क होत नसल्याची धूण चिंचपूर पांगुळ पंचक्रोशीतील नागरिकांच्या ऐकावावी लागत आहे. या ठिकाणाचे वास्तव पाहिलेस चिंचपूर पांगुळ परिसरात डोंगरानी वेढलेला आहे. या परिस्थितीत या ठिकाणी बीएसएनएलच्या टाँवर आल्याने अनेक परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने बीएसएनएलच्या भ्रमणध्वनीला पसंती दर्शवून सुविधाचा उपभोग सुरु होता. या दरम्यान, ही सुविधा नादुरुस्त होऊन ५ ते ७ दिवस उलटून गेली आहेत. राज्यातील, जिल्हा, तालुक्यातील गावातील नातेवाईकांशी बीएसएनएल भ्रमणध्वनीवरुन स्थानिक नागरिकांचा संपर्क होत नाही. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसह अन्य व्यावसायिकची केवळ संपर्क होत नसल्याने मोठी कुचंबणा होत आहे. यामुळे अनेकांचे भ्रमणध्वनीवरुन करण्यात येणारे व्यवहार ठप्प होऊन आर्थिक घडामोडी थांबली आहे. बीएसएनएल मुख्य अधिकारी यांनी डोंगरी भाग व येथील नागरिकांची गैरसोय लक्षात घ्यावी. तातडीने चिंचपूर पांगुळ परिसरातील नादुरुस्त बीएसएनएल मोबाईल टाँवरची दुरुस्ती करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments