Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

येळी टोलनाक्याजवळ टेम्पोचा अपघात ; २५ ते ३० लहान मुलांसह मजूर जखमी

 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.१२ : तालुक्यातील येळी टोलनाक्याजवळ मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चालकाचा तोल सुटल्याने टेम्पा पलटी झाला. या अपघातामध्ये नागरिक जखमी झाले असून, यात लहान मुलाचा समावेश आहे. यात अनेकांचे हात-पायाला जखमा झाल्याची प्राथमिक माहिती समजते.

लाँकडाऊन सुरु असल्याने विशाखापट्टणम महामार्गे मुंबईहून काही मजूर परभणीकडे टेम्पोतून जात होते. या दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील येळी टोलनाक्याजवळ ४०७ टेम्पो चालकाला मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास डुकली लागली. यात चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पा रस्त्यावरुन खाली जात पलटी झाला. या अपघातात २५ ते ३० नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळाताच, पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून तातडीने पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघात दरम्यान तत्परता दाखवत रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांनी व येळीचे नामदेव बडे यांनी अपघातातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात येऊन, नागरिकांसह लहान मुलांना खाण्याची व्यवस्था केली. 

Post a Comment

0 Comments