Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केशरी शिधापत्रिकाधारकांना मे महिन्‍याप्रमाणे जून महिन्यात धान्याचे नियोजन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि. 28- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्‍हयातील एकूण 3 लाख 32 हजार 24 केशरी शिधापत्रिकावरील 14 लाख 90 हजार 17 लाभार्थ्‍यांना  प्रति व्‍यक्‍ती 5 किलो ( गहू 03 व तांदूळ 2 किलो) या प्रमाणात माहे मे व जून 2020 या महिन्‍यांचे  धान्‍य वितरणाचे नियोजन करण्‍यात आले होते. त्‍यानुसार माहे मे 2020 महिन्‍यामध्‍ये आतापर्यत 1 लाख 72 हजार 751 केशरी शिधापत्रिकांवरील 7 लाख 22 हजार 572 लाभार्थ्‍यांनी लाभ घेतलेला आहे. उर्वरित सर्व केशरी शिधापत्रिकाधारकांनी माहे मे 2020 या  महिन्‍याचे  धान्‍य खरेदी करण्‍यात यावे.
     तसेच माहे मे 2020 या महिन्‍यात वितरीत करण्‍यात आलेल्‍या धान्‍याचे प्रमाणानुसार माहे जून 2020 या महिन्‍याचे नियतन निश्‍चित करण्‍यात येणार आहे.  सर्व केशरी शिधापत्रिकाधारकांना स्‍वस्‍त धान्‍य दुकानांमधून निर्धारित करण्‍यात आलेल्‍या दराप्रमाणे ( गहू 8 रुपये व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) धान्‍य खरेदी करण्‍याचे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments