Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रा.कारभारी ढाकणे यांचे निधन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य कारभारी दादाबा ढाकणे यांचे नुकतेच निधन झाले. स्व. ढाकणे यांनी जुन्नर तालुक्यातील आणे येथील रंगदास स्वामी शिक्षण संस्थेतून शिक्षकपदापासून ते प्राचार्य पदापर्यंत काम केले आहे. हा सर्व काळा त्यांनी बालमटाकळी (ता.शेवगाव), रांजणगाव (ता.पारनेर), घारगाव (ता.संगमनेर) या ठिकाणी कार्यरत केला. त्यांच्या या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण ढाकणे, भाजपा अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ढाकणे यांचे ते वडील तर वंजारी ओबीसी विकास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ढाकणे याचे ते चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments