Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीगोंद्यात बिअर शॉपमध्ये चक्क देशी-विदेशी दारु ; दारु जप्त करताना विरोध करताच सरकारी कामात अडथळा आणल्याने पती-पत्नीवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
श्रीगोंदा, दि.22 :  तालुक्यातील कोळगाव येथे बिअर शॉपीचा परवाना असताना चक्क अडीच लाखापेक्षा जास्त देशी-विदेशी दारु साठा बेकायदेशीर ठेवल्याप्रकरणीच्या कारवाई दरम्यान, विरोध केल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दिपक आबासाहेब नलगे (कोळगांव फाटा ता.श्रीगोंदा) हे त्याच्या निखील बिअर शॉपमध्ये फक्त बिअर विक्रीचा परवाना असताना तेथे देशी-विदेशी दारुची बेकायदा चोरुन विक्री करतो. तसेच त्याचे राहते घरी भापकरवाडी रोड ( कोळगांव ता.श्रीगोंदा) येथे मोठया प्रमाणात देशी-विदेशी दारुचा साठा केला आहे, अशी गोपनीय माहीती एलसीबीची पो. नि. दिलीप पवार यांनी मिळाली. यानुसार एलसीबी पथकातील कर्मचारी यांनी सदर ठिकाणी छाप्यासाठी बेलवंडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह दोन पंचासमक्ष निखील बिअर शॉपी येथे जाऊन खात्री केली असता, सदर ठिकाणी एक इसम निखील बिअर शॉपीमध्ये विदेशी दारुची विक्री करताना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव दिपक आबासाहेब नलगे (वय-42 रा.कोळगांव ता.श्रीगोंदा) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडून ४९ हजार ५३६ रुपये किंमतीची देशी-विदेशी दारु त्याचे बिअरशांपीमधून पंचासमक्ष जप्त केली. त्यानंतर दुसरे ठिकाणी त्याचे राहते घरी भापकरवाडी रोड कोळगांव येथे खात्री करण्यासाठी गेलो असता, तेथे असलेल्या एका महिलेने पथकास घरात जाण्यास मज्जाव केला. यावेळी सरकारी कारवाईमध्ये अडथळा आणला व सोबत असलेली महीला पोलीस कर्मचारी यांस शिवीगाळ धक्काबुक्की केली. या कारणास्तव सौ.संचीता दिपक नलगे (वय-35 रा.कोळगांव ता.श्रीगोंदा) यांना  ताब्यात घेऊन पंचा समक्ष घराची झडती घेतली. या दरम्यान ठिकाणीहून १ लाख ९८ हजार ९४२ रुपये किंमतीची देशी - विदेशी दारुचा साठा मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर दोघा आरोपी पती - पत्नी यांचेकडुन २ लाख ४८ हजार ४७८ रुपये किंमतीची देशी विदेशी दारु अवैधरित्या बाळगताना मिळुन आल्याच्या पोकॉ रवींद्र तुकाराम घुंगासे यांचे फिर्यादीवरुन बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 1 177/2020 भादवि कलम 353, 504, 506,सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा पती व पत्नी पुढील कारवाईसाठी बेलवंडी पोलीसांच्या ताब्यात दिले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबी पथकातील पोहेकॉ विजयकुमार वेठेकर,पोना रवींद्र कर्डीले,पोना संतोष लोढे,पोना सचिन आडबल,पोकॉ प्रकाश वाघ, पोकॉ संदिप दरंदले, रविंद्र घुंगासे, रोहीदास नवगीरे,संदीप चव्हाण,कमलेश पाथरुड,विनोद मासाळकर,रोहीत मिसाळ,सागर सुलाने,मपोकॉ सोनाली साठे, सचिन कोळेकर संभाजी कोतकर, शिवाजी ढाकणे आणि बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोसई प्रकाश बोराडे, पोना रावसाहेब शिंदे,पोकॉ दादासाहेब क्षिरसागर, मपोकॉ सुरेखा वलवे,मपोकॉ विदया धावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments