Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिचोंडी पाटील परिसरातील डीपी अभावी शेतक-यांची पिके धोक्यात, महावितरण कंपनीचे दुर्लक्ष ; शेतकरी संतप्त

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील वाडीचा मारुतीजवळील ,भातोडी रस्त्यावरील वेताळ डीपीवर असणा-या शेतक-यांनी विजबीले आहेत. यानंतर विजरोहित्र (डीपी) नादुरुस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने वारंवार अनेकांनी विजरोहित्र महावितरणाने तातडीने दुरुस्ती करावी मागणी केली. परंतु याकडे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. येत्या काही दिवसात विजरोहित्र दुरुस्त न केल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा भाजपा किसान मोर्चा नगर तालुका अध्यक्ष बबनराव शेळके , मा.उपसरपंच शरद पवार, सरपंच अंजना पवार उपसरपंच महेश पाटील आदींनी दिला आहे.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील वाडीचा मारुतीजवळील,भातोडी रस्त्यावरील वेताळ डीपीवर असणा-या शेतक-यांनी बीले भरल्यानंतर 20 ते 22 दिवसापूर्वी डीपी जळाली. 3 ते 4 पाणी कांद्यासाठी लागत असून चिचोंडी पाटिलच्या विद्युत उपकेंद्रामध्ये जाऊन शेतकऱ्यांनी अधिका-यांच्या भेटी घेऊन त्यांचे उंबरे झिजून झिजून अक्षरशः बळीराजा थक्कला आहे. विशेष या डीपीवर किमान 70 ते 80 एचपीचा लोड असून सुद्धा प्रत्येक वेळेस याठिकाणी 63 एचपीडीपी दिली जाते. अनेक वेळेस शेतकऱ्यांनी शंभरच्या डीपीची मागणी केली,परंतु प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्या 100 चा डीपीचा प्रस्ताव पाठवून देऊ म्हणजे तुम्हाला पुढील वेळेस शंभर एचपीची डीपी मिळेल, असे अधिकारी प्रत्येक वेळेस सांगत असतात. परंतु प्रत्येक वेळेस हे अधिकारी 63 एचपीची डीपी मारुतीजवळील वेताळ डीपीवर दिली जाते. लोड जास्त असल्याकारणाने डीपी सुद्धा जळत आहे. काही शेतक-यांच्या शेतात कांदा व भुईमुग आणि इतर पिके असून डीपी चालू नसल्याने पिकं सुकू लागली आहेत.
उन्हाळा असल्याने पिकांना 4 ते 5 दिवसालाच पाणी द्यावे लागते , याचे कुठलेच गांभिर्य या अधिका-यांना नाहि. 3 महिने दिवस रात्र कष्ट करुन ,मेहनत करुन ,हजारो रुपये शेतात खर्च करुन 2 ते 3 पाण्यासाठी जर डोळयासमोर पिक वाळताना पाहणा-या शेतक-यांच्या तळपायांची आग मस्तकाला गेल्या शिवाय राहनार नाही.परंतु या अधिका-यांसाठी हे फुजूल आहे.
हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या घास या अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे हिसकावला जाण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत पडले आहेत,कारण कांद्या सारख्या 
पिकास जास्त खर्च येत असतो , त्यातच कोरोनावायरस मुळे जो जनतेच्या फायद्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले या मुळे शेतकरी होरपळुन निघत आहेत,शेतक-यांची अक्षरशः वाताहात झालेली आहे , चिचोंडी पाटिल येथील सपटेशनचे अधिकारी फक्त उडवा उडवीच उत्तरे देतात , नगर तालूक्याचे अधिकारी कोपनर साहेब तर चक्क हात झटकुन मोकळे होतात, अशा अधिका-याची बदली करण्यात यावी, असेही संतप्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments