Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

..आता लाभार्थ्यांना घरपोहच पोषण आहार


जि.प.मबास सभापती शेटे यांच्या जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सूचना
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.६ - शाळेतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थींचा बंद करण्यात आलेला पोषण आहार पुन्हा पूर्ववत सुरू करून तो लाभार्थ्यांना दि.१५/५/२०२० पर्यंत टीचआरच्या स्वरूपात गरम ताजा आहार घरपोहच करण्याच्या सूचना जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना जि.प.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मिराताई शेटे यांनी दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात ३ ते ६ वर्षे वयोगटातील १२३१६१ पोषण आहारचे एकूण लाभार्थी आहेत. या सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अंगणवाडीत एकत्रित बसून ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी पोषण आहाराचा लाभ दिला जात होता. तो आहार कोरोनाच्या पाश्वभूमीवर बंद ठेवण्यात आला होता. तो आता पुन्हा पूर्ववत सुरु ठेवावा.परंतु तो दि.१५/५/ २०२० पर्यंत टीचआरच्या स्वरूपात गरम ताजा आहार घरपोहच करण्याच्या सूचना जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना जि.प.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मिराताई शेटे यांनी देण्यात आल्या आहेत.
नगर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी प्रकल्प क्षेत्रातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी, यात तीव्र वजन कमी असणारे बालके, गर्भवती व स्तनदा माता आणि ११ ते १४ मधील शाळाबाह्य किशोरवयीन मुली यांना कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा मार्च व एप्रिल २०२० देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील १०० टक्के अंगणवाडी केंद्र व मिनी अंगणवाडी केंद्रातील ६ महिने त ३ वर्षे वयोगटातील सर्व साधारण १३७१०५ बालके, तीव्र वजनाची ३८१७ बालके, गर्भवती व स्तनदा माता ५४०४५ आणि ११ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य किशोरवयीन मुली ५५४ असे एकूण १९८१६४ लाभार्थ्यांना घरपोहच गरम ताजा पोषण आहाराचा लाभ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मार्फत करण्यात येणार आहे, असे सभापती शेटे यांनी सांगितले. Post a Comment

0 Comments