Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अब ब ब.. स्कूल व्हँनमधून दारू विक्री ; नागरदेवळेफाटा येथे दीड लाखांचा मुद्देमालासह एकजण पकडला


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.६ - आत अँब्युलन्सनंतर नागरदेवळेफाटा येथे स्कूल व्हँनमधून विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले. एकाजणासह १ लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय एकनाथ लोणारे (रा.कापूरवाडी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. भिंगार कँम्प पोलीसांनी कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नगर ते कापूरवाडी या रस्त्यावर नागरदेवळेफाटा येथे नागरदेवळे कमानीजवळ संजय लोणारे हा इसम पिवळ्या रंगाच्या स्कूल मारुती व्हँनमध्ये विदेशी दारु विक्री करत आहे, अशी भिंगार कँम्पचे सपोनि प्रविण पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. या खात्रीशीर माहितीनंतर तातडीने घटनास्थळी जाऊन छापा टाकून पंचासमक्ष पिवळ्या स्कूल व्हँन (एमएच १२ ए एफ ४८८९) ची पोलिसांनी झडती घेतली असता, व्हँनमध्ये ४ हजार ६८० रू. ३६ मँकडाल रम कंपनीच्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या. स्कूल व्हँन, दारुसह १ लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संजय लोणारे यांच्या विरोधात भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात दारुबंदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कँम्पचे सपोनि प्रविण पाटील, पोउपनि पंकज शिंदे, पोना आर ए सुद्रीक, पोकाँ सचिन धोंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

1 Comments

  1. Bhautek Nagarkar serva record todnar ase wate yaa agodar Ambulance pakadli hoti , Sarkar gaspiline dware gas denar ahe tari daruchi soyaa ya pipline sobay karun dyavi manze pudhil carona 2 laa janta trasatun mukta hoil

    ReplyDelete