Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घर घर लंगर सेवा हा राज्यासाठी आदर्श उपक्रम ठरेल - अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शहरातील विविध समाजातील बांधव, सामाजिक संस्था, उद्योजक आदींनी एकत्र येऊन लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेल्या घर घर लंगर सेवा या उपक्रमामुळे आतापर्यंत सुमारे 2 लाख नागरिकांना भोजन मिळाल्याने ते तृप्त झाले आहेत. त्यांची उपासमार दूर झाली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाच्या वतीने आज या उपक्रमात सहभाग घेत शहरातील सुमारे 7 हजार लोकांना मिष्टान्न भोजन पॅकेट वितरित करण्यात आले. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांत राबविला जावा. राज्यातील विविध ठिकाणी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. मात्र, नगरमध्ये समाजबांधवांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेला घर घर लंगर सेवा हा उपक्रम राज्यात बहुदा पहिलाच असावा. हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असे विश्‍वास जिल्हा पोलीसप्रमुख सागर पाटील यांनी व्यक्त केला.
नगर शहरातील विविध समाजातील बांधवांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या घर घर लंगर सेवा उपक्रमात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज पोलीस प्रशासनाने योगदान दिले. जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीने मिष्टान्न भोजन बनवून त्याचे सुमारे 7 हजार पॅकेटस् शहरातील विविध भागांत पोलीस प्रशासनाच्या वाहनांतून नेण्यात आले. या वाहनांवर पुष्पवृष्टी देखील यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा पोलीसप्रमुख सागर पाटील, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच हरजितसिंग वधवा, प्रशांत मुनोत आदी उपस्थित होते.
श्री. संदीप मिटके म्हणाले की, कोरोना जागतिक वैश्‍विक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरवीसायांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या घर घर लंगर सेवेमुळे कोणीही उपाशीपोटी राहिले नाही. इतरांनी प्रेरणा घ्यावा, असाच हा उपक्रम आहे. आज महाराष्ट्र दिनी पोलीस प्रशासनाने यामध्ये योगदान दिले. शहरातील गोरगरीब लोकांना हे भोजनाचे पॅकेटस् वितरित करण्यात आले. हरजितसिंग वधवा यांच्या पुढाकारामुळे हे उपक्रम शहरात सुरू होऊ शकला, असे ते म्हणाले.
हरजितसिंग वधवा म्हणाले की, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर 22 मार्चला मी वंचितांसाठी घर घर लंगर सेवा देण्याच्या उपक्रमाबाबत वरिंदरसिंह आनंद, प्रशांत मुनोत, पृथ्वीपालसिंह धूपर, जनक आहुजा, सुनील छाजेड, किशोर मुनोत, विपूल शाह, अनीश आहुजा, सनी वाधवा यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ही सेवा सुरू केली. पहिल्या दिवशी या मान्यवरांनी घरोघरी भोजन बनवून 350 लोकांना सेवा दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी जिल्हा पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांची भेट घेण्यास सांगितले. त्यांनी लॉकडाऊन दरम्यान लंगर वितरित करण्याची परवानगी दिली. या सेवेस जोडण्यासाठी समाजबांधवांना आवाहन केल्यानंतर त्यात अनेकजण जोडले गेले. भोजनाचे पॅकेट तयार करून ते वितरित करणे सोपे झाले. आज शहरातील अनेकांची भूक आम्ही भागवू शकलो. हे सर्व पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे, असे ते म्हणाले.
या लंगर सेवेसाठी अजय पंजाबी, अ.नगर मशिनरी असोसिएशन, कल्पतरू फिरोदिया एन्टरप्राईज, सीख, पंजाबी, सिंधी, जैन व गुजराती समाज, जयआनंद फाउंडेशन, पंजाबी सेवा समिती, सेवा प्रीत, समर्पण ग्रुप, गुरुद्वारा भाई दया सिंहजी, जीएनडी ग्रुप, शरद मुनोत, वंदे मातरम, एल अँड टी, दिनेश चोपडा, ईश्वर बोरा, संतोष तोडकर, वंदना गांधी, श्रीमती आडेप, शैलेंद्र बगाडे, श्री बालकृष्णन, महेश गुंदेचा, डॉ. संजय आसनानी, भारत बागरेचा, दिनेश छाबरिया, स्ट्राइकर ग्रुप, सेक्रेड हार्ट 89, 94 और 75 बैच, हॉटेल सुवर्णम प्राइड, उद्धव तलरेजा, कौशिक शिरहट्टी, जनक आहुजा, वाधवा परिवार आदींनी योगदान दिले.
प्रशांत मुनोत म्हणाले की, 3 एप्रिलला 850 भोजनाचे पॅकेट वितरित केले. आता 5 हजारपेक्षा अधिक लोकांना हे पॅकेट वितरित केले जात आहेत. 8 वितरण टिम यासाठी कार्यरत असून, त्या संपूर्ण नगर शहरात लंगरचे वाटप करतात. 1 मे महाराष्ट्र दिनी सुमारे 7 हजार मिष्टान्न भोजन पॅकेट वितरित करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या भोजन पॅकेट वितरणासाठी पोलिसांचे मोठे सहकार्य लाभले.
यामध्ये राजा नारंग, राहुल बजाज, गोविंद खुराना, संदेश रपरिमा, दामोदर मखीजा, सुनील मेहतानी, मनित भल्ला, अंकित भूटानी, नारायण अरोरा, राहुल शर्मा, सिमरन वधवा, विकी मेहरा, अमोल कोल्हे, विनायक कुलथे, जसमीत सिंह वधवा, राम बालानी, गगन कुकरेजा, सुरेश कुकरेजा, सूरज, दलजीतसिंह वधवा, सागर पंजाबी, आशीष कुमार, हरविंदर सिंह नारंग आदी विविध जबाबदार्‍या पार पाडत आहेत.

Post a Comment

0 Comments