Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रातील प्रत्येक परीचारिकेस रुपये सात हजार रु. सानुग्रह अनुदान द्यावे -श्रीनिवास बोज्जा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : कुरोना विषाणू मुळे संपूर्ण जग भयभीत झालेले असताना मानव जातीला वाचविण्यासाठी डॉक्टर व परिचारिका यांनी जीवाचे रान केले आहे, अनेक परिचारिकाना या भयानक विषाणू ला तोंड देतादेता जीव गणवावा लागलाय तरी सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता सदर परिचारिका सेवाभाव वृत्तीने आपले काम करीत आहेत , तरी त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना प्रत्येकी रुपये 7000/- सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी विश्व् निर्मल फाँडेशन चे अध्यक्ष श्रीनिवास बौज्जा यांनी केली .
परिचारिका दिनानिमित्त। विश्वनिर्मल फाँडेशन, अहमदनगर च्या वतीने अहमदनगर महानगर पालिकेच्या बोल्हेगाव येथील आरोग्य विभागातील परीचारिकेचा प्रशस्ती पत्र व मेडल देऊन सन्मान करण्यात आले.
सध्याच्या परिस्थितीमध्ये परीचारिकेचे कार्य हे दैवीकार्य आहे. प्रत्येक हॊस्पिटल मध्ये परीचारिके शिवाय ङोक्टराना रुग्णावर उपचार करता येत नाही अशी परिस्थिती आहे . सदर परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता व स्वताच्या जीवाची पर्वा न करता मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून या उद्देशाने रात्रंदिवस समाजाची सेबा करीत आहेत , परंतु त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल प्रशासनाने घेतलेली दिसून येत नाही . अश्या स्थितीत परिचारिका दिन नुकतेच पार पडले असून त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून परीचारिकेस सानुग्रह अनुदान प्रत्येकी रुपये 7000 /- जाहीर करावे असे निवेदन आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे, मुंबई यांना निवेदना द्वारे विश्व निर्मल फौंडेशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी इमेल द्वारे केले आहे .

Post a Comment

0 Comments