Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरेवाडीत सोशल डिस्टेंस पाळून मास्कचा वापर करीत मोजक्या लोकांमध्ये विवाह संपन्नआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.६ - कोरोना महामारीच्या संकटामुळे विवाह संस्था अडचणीत सापडल्या आहेत. शासनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी विवाह रद्द झाले आहेत किंवा पुढं ढकलले आहेत. अशा स्थितीत नगर तालुक्यातील दरेवाडीतील तुक्कडओढा येथे घरामध्येच ४ ते ५ लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून आणि मास्कचा वापर करून विवाह सोहळा संपन्न झाला. 
अजय विष्णू गायकवाड आणि ज्योती भाऊसाहेब म्हस्के उच्चविद्याविभूषित वधूवर मास्क लावून विवाहबद्ध झाले. दरेवाडीचे सरपंच अनिल करांडे आणि मुलीचे मामा सुदाम निमसे यांच्या मार्गदर्शनानुसार हा विवाह पार पडला. 
लॉकडाऊन नसते तर या सोहळ्यासाठी किमान ५ लाखांचा चुराडा झाला असता. मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा अवघ्या १० हजार रुपयात पार पडला. खर्चात बचत झाल्यामुळे गोरगरीब जनतेला अन्न धान्य वाटपासाठी निधी वापरण्याचा संकल्प गायकवाड आणि म्हस्के या परिवाराने केला. लग्नांतील आवाक्याच्या बाहेर जाणाऱ्या खर्चामुळे दोन्ही परिवाराला कर्जबाजारी व्हावे लागते. परस्पर समन्वय आणि कायद्यांचे पालन करून हा विवाह सोहळा अहमदनगर तालुक्यात आदर्श ठरला आहे. 
दरेवाडी येथील विष्णू गायकवाड यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह भाऊसाहेब म्हस्के यांची मुलगी ज्योती हिच्याशी जमला होता. विवाहाचा मुहूर्त काढण्याची तयारी सुरू असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अतिशय साधा आणि आकर्षक विवाह पार पडण्याचे वधुवरांचे कपडे, आवश्यक दागिने आदींसाठी फक्त 10 हजारांचा खर्च झाला. दिमाखात सोहळा झाला असता तर या सोहळ्यासाठी 5 लाखांच्या वर चुराडा झाला असता. ज्योती आणि अजय या नवदाम्पत्यांनी वाचलेल्या खर्चातून गरिबांना अन्न धान्य वाटप करण्याचा संकल्प केला. अतिशय कमी खर्चात आणि कमी लोकांमध्ये विवाह सध्या संपन्न होत असल्यामुळे अशा विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे असे मत याठिकाणी उपस्थितांनी व्यक्त केले. विवाह समारंभासाठी वाचणारा खर्च हा लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब लोकांच्या अन्नधान्यासाठी केला जात असल्याने सर्वसामान्य लोकांमधून मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सध्याच्या विवाह सोहळ्यात भोजनावळी नाही, आहेर नाहीत, मानसन्मान, ध्वनिक्षेपण, वाजंत्री यंत्रणा नाही. असे हे लाखो रुपये खर्च करणारे विवाह सोहळे आता अगदी कमी खर्चात कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे होत असल्याने यजमान मंडळीमधून समाधान व्यक्त करीत आहेत. 


Post a Comment

0 Comments