Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्हयातील अॅक्टीव केसेस ३७ ; ४ रुग्ण कोरोनामुक्त, पाथर्डी व संगमनेर प्रत्येकी १ तर सारसनगर २ रुग्णांचा समावेश


आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : दि.२८ - जिल्हयातील अँँक्टीव केसेस ३७ असून उर्वरित 3 नाशिक येथे उपचार घेत आहेत. गुरुवारी (दि.२८) जिल्ह्यातील ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाथर्डी आणि संगमनेर येथील प्रत्येकी १ तर सारसनगर येथील २ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत एकूण ५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात ४ नवीन रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित. इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये ७ अहमदनगर आणि उर्वरित २ मुंबईचे होते. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १०३ आहे. यामध्येमहानगरपालिका क्षेत्र १८, अहमदनगर जिल्हा ५०, इतर राज्य २, इतर देश ८ इतर जिल्हा २५ आलेले आहेत.
अहमदनगर जिल्हयातील अँँक्टीव केसेस ३७ असून उर्वरित 3 नाशिक येथे आहेत. जिल्ह्यातील रुग्ण मृत्यू दर ८.७३ टक्के असून, एकूण स्त्राव तपासणी २२३७, निगेटीव २०३६, रिजेक्टेड २५, निष्कर्ष न निघालेले १५, उर्वरित अहवाल बाकी ५५ आहेत.

Post a Comment

0 Comments