Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दाळमंडई - आडते बाजार परिसरातील दुकाने सुरू करण्यात यावीत ; आ.जगतापाच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांची मागणी


आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आडते बाजार मर्चंट असोसिएशन व व्यापारी यांनी आयुक्त श्रीकांत मायकलार यांची भेट घेऊन दाळमंडई - आडते बाजार परिसरातील दुकाने सुरू करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, नगर शहराच्या काही भागात कोरोनाबाधीत रुग्ण आढळ्याने तो परिसर हॉटस्पॉट करण्यात आला आहे. तर त्याच्या जवळील २ कि.मी. चा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आल्याने शहरातील चालू झालेले अनेक व्यवसाय व दुकान पुन्हा बंद करण्यात आले आहे. अहमदनगर शहरच्या दृष्टीने २ कि.मी. चे बफर झोनच्या अंतराची मर्यादा मोठी आहे. यामुळे निम्मे नगर शहर बंद अवस्थेत आहे. जो बफर झोन आहे त्या ठिकाणी दाळमंडई व किराणा व्यापारी असल्याने ही जीवनावश्यक सेवा देखील बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 
या पार्श्वभूमीवर आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली आडते बाजार मर्चंट असोसिएशन व व्यापारी यांनी आयुक्त श्रीकांत मायकलार यांची भेट घेऊन दाळमंडई - आडते बाजार परिसरातील दुकाने सुरू करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्यासमवेत प्रा. माणिकराव विधाते सर, अभिजित खोसे, उबेद शेख, गोपाल मणियार, संजय लोढा, अशोक भंडारी, सचिन कटारिया, रवींद्र गुजराथी, राजेंद्र डागा, ललित गुगळे, अजित गुगळे, ललित कटारिया, दिनेश शिंगवी, कमलेश भंडारी, सुशील भळगट, विष्णू अँड कंपनी, पोपटलाल पुरुषोत्तमदास आदी आडते बाजार असोसिएशनचे व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments