Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वारे वा प्रशासन, शेतकऱ्यांनी भाजीविक्रीसाठी आल्याने लाठी पण, वाईन शाँपच्या रांगेच्या गर्दीकडे पोलीसांचे दुर्लक्ष !, ; सोशल डिस्टेंसिगचा फज्जा


आँंनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर दि.५ - अखेर आज मंगळवारी वाईन शाँप मंदिराचा दरवाजा उघडला. तोच पाहात काय सोशल डिस्टेंसिगचा फज्जा उडवित वाईन शाँपचा भक्त सकाळापासून दरामध्ये रांगेत उभा, काही ठिकाणी गर्दी झाली. परंतु इथे कोणता शेतकरी अथवा भाजीविक्रीसाठी नसल्याने बहुतेक येथे लाठीबाबत पोलीस प्रशासनाने ठरविलेले कदाचित नव्हते की काय अशी परिस्थिती डोळे भरुन नगर शहरातील वाईन शाँप मंदिरासमोर पाहण्यास मिळाली.

वाईन शाँप मंगळवारी सुरु होण्याच्या खबरीने अनेक तळीरामांना भलताच आनंद झाला. मंगळवारीचा सकाळ उघडी नाही तोच, तळीरामांनी सकाळी सकाळीच वाईन शाँपच्या वाऱ्या सुरु केल्या. यात काहींनी दारु मिळण्यासाठी लांबचीलांब रांगेत उभे राहणे पसंत केले. यात काही तळीरामांना दारु मिळल्याने जणू काही एखादा गड जिंकल्यागत आव आणीत होते.
रांगेत उभ्या असणाऱ्या अपवाद तळीरामांनी पुन्हा लाँकडाऊन च्या काळात मद्य विक्री बंद होणार, या धास्तीने एक ते दोन महिन्यांचा स्टाकाचे नियोजन केले असल्याने, आता तो घेणारच, अशीही तळीराम एकमेकांशी चर्चा करताना दिसून आले. काही वाइन शाँपला दारु घेण्यासाठी गर्दी ही झाली पण तिकडे पोलीस दादा फिरकलाच नाही. परंतु शेतकरी, भाजीपाला विक्रीत्यांकडे गर्दी झाली, या कारणाने पोलीसांची लाठी खावी लागली. या लाँकडाऊनच्या काळात हे वास्तव पुढे आल्याने, संवेदनशील व्यक्तीच्या तोंडून काय अजब हे सरकार म्हटलं नाहीतर नवलचं!

Post a Comment

0 Comments