Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पालिका अधिकारी व ठेकेदार यांचे कचरा कुरण ; कचरा उचलण्याची अवास्तव बिले सादर करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने


वाढीव रक्कम लाटण्याचा स्वयंभू ट्रान्सपोर्टचा   घाट , चौकशी व कारवाई करा : शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची मागणी 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : अहमदनगर महानगर पालिका ज्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट द्वारे  कचरा संकलन करून घेत आहे. तो ठेकेदार कचरा संकलन हे कुरण समजून  न उचलला गेलेल्या कचऱ्याची अव्वाच्या सव्वा बिले सादर करीत मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाढीव रक्कम लाटण्याचा घाट घालत आहे. हे प्रकरण नगर शहर  शिवसेनेने  शोधले आहे.   शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांच्याकडे मनपा अधिकारी आणि ठेकेदाराचा खोटेपणा सिद्ध करणाऱ्या  कागदपत्रांचे पुरावे   सादर करून या संदर्भात चौकशी आणि कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. 
    अहमदनगर महानगर पालिकेने स्वयंभू ट्रान्सपोर्ट सोबत जो करार केलेला आहे. त्यातील अति शर्तींचा भंग होत असून अत्यावश्यक सेवा आणि स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या नावाखाली मनपा उपायुक्त सुनील पवार यांनी  डोळ्यासमोर धडधडीत घोटाळा दिसत असताना पार्ट पेमेन्ट म्हणून   सर्व च्या सर्व पैसे ठेकेदाराला   अदा करण्याचा अहवाल दिला आहे. हा खोटा व बेकायदेशीर अहवाल  ते कसा देऊ शकतात असा सवाल गिरीश जाधव यांनी विचारला आहे.  यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ . अनिल बोरगे तसेच स्वच्छता निरीक्षक संबंधित कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या खाजगी रजिस्टरवर सह्या करण्यास का सांगत आहेत. मनपा आयुक्तांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे जाधव यांनी या निवेदनात म्हंटले आहे. 
   अहमदनगर महानगरपालिकेने स्वयंभू ट्रान्सपोर्टसी जो करार केला त्यात या ठेकेदाराने  सर्वेक्षणानुसार  प्रतिदिन १३० टन कचरा उचलण्याचे ठरले होते. नोव्हेंबर २०१९ च्या बिलात १४० मे . टन कचरा गोळा झाला पण डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी १९३ ते १९८  मे.  टन कचरा गोळा झाल्याचे ठेकेदाराने सांगितले . जानेवारी महिन्यात  तर प्रतिदिन १९८.२० टन कचरा गोळा झाल्याचे बिल ठेकेदाराने मनपाकडे सादर केले आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण आणि स्वच्छ भारत मिशन मुळे हा ५३ ते ५८मे.   टन अतिरिक्त कचरा गोळा झाल्याचा खुलासा ठेकेदाराच्या बाजूने स्वच्छता निरीक्षकांनी खास अहवाल देऊन केला आहे. हा कचरा संकलन घोटाळा कागदावर स्पष्ट दिसत असताना  त्यावर वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे यांनी ८० टक्के बिल अदा करण्यास हरकत नसल्याचे मनपा कर विभागाचे उपायुक्त सुनील पवार यांना कळवले होते. त्यासोबत बोरगे यांनी घंटा गाड्या आणि कचरा डेपोवर जाण्याऱ्या गाड्यांचा जी पी एस रिपोर्ट जोडला होता. मात्र त्यात कोणत्या गाड्या शहरातच थांबल्या आणि कोणत्या गाड्या कचरा डेपोवर गेल्या हे स्पष्ट न झाल्याने पवार  यांनी   कचरा डेपोवरील रजिस्टर आणि वजन पावत्यांची तपासणी केली. तेव्हा त्यांना या रजिस्टर मध्ये आणि कचरा वजन पावत्याच्या नोंदी मध्ये  मध्ये मोठी तफावत आढळून आली . ही गंभीर बाब उपायुक्तांनी आपल्या अहवालात नमूद केली आहे. डेपोवरील रजिस्टर हे विहित नमुन्यात नाही तसेच त्यावर डेपो इन्चार्ज , मुख्य स्वच्छता निरीक्षक , मुख्य आरोग्य अधिकारी यांच्या सह्या नाहीत हे ध्यानात आल्यानंतर आरोग्य अधिकारी बोरगे यांनी मनपातील लिपिक संजय हाळसे, आणि मुकादम अनिल वाणे यांना कचरा नोंद रजिस्टर आणि काटा पावती यांची तपासणी  करण्यास तोंडी आदेश देऊन सांगितले होते. रजिस्टर आणि काटा पावती मध्ये मोठी तफावत असल्याचे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी कळवले आहे. तसेच ठेकेदाराच्या खाजगी रजिस्टरवर सह्या करण्यास या दोघांनी नकार दिला आहे. तरीदेखील बोरगे यांनी बिल अदा करण्यास हरकत नाही असा अहवाल दिला कसा असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे. 
 सध्या लॉक डाऊन आहे. ज्या काळात शहर पूर्णपणे बंद होते . मुकुंदनगरचा परिसर सील होता तेव्हा देखील शहरातूनप्रतिदिन  १९० मे टन कचरा गोळा झाल्याच्या पावत्या या ठेकेदाराने तयार  केल्या  आहेत .  लोकडाऊनच्या सुरुवातीला मनपा कर्मचाऱ्यांनी तीन दिवस संप केला होता. यामुळे नगर शहरात घंटा गाड्या कचरा उचलण्यासाठी आल्याचं नाहीत तरीदेखील यादिवशीही कचरा उचलल्याचे हा ठेकेदार दाखवतो आहे. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टीने मनपा अधिकारी आणि ठेकेदार भ्रष्टतापूर्वक बेकायदा अहवाल तयार करून  देय  नसलेली रक्कम देखील अदा करण्यास सांगून मनपाचे आर्थिक नुकसान करीत आहेत. त्यामुळे याची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी ,  शिवसेनेला आंदोलन करण्यास भाग पाडू नये अशी विनंती जाधव यांनी केली आहे.  


Post a Comment

0 Comments