Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीने संस्थात्मक देखरेखीखाली असणार्‍या व्यक्तींना पुस्तकांचे केले वितरण

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.१३ - राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यात एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. त्यांच्या वतीने आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी संस्थात्मक देखरेखीखाली असणार्‍या व्यक्तींना वाचण्यासाठी विविध पुस्तके उपलब्ध करुन दिली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ही पुस्तके आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्त करण्यात आली तसेच संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आली. 

सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात बाहेरगावाहून अथवा परजिल्ह्यातून कोणी व्यक्ती आला तर त्याला संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. या व्यक्तींना तिथे असताना त्यांचा वेळ चांगल्या प्रकारे व्यतित व्हावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी यंत्रणा कार्यरत असते.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या प्रयत्नांमध्ये आणखी एक चांगला उपक्रम राबवला आहे. त्यांनी स्वत: पुढाकार घेत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा संग्रह, स्टीव जॉब्जची पुस्तके, शामची आई अशा विविध विषयांवरील दीडशेहून अधिक पुस्तके जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केली. ऐतिहासिक, प्रबोधनपर, विज्ञान, व्यवस्थापन, सामाजिक, राजकीय, आत्मचरित्र अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा या संचात समावेश आहे. सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारी ही पुस्तके आता संस्थात्मक देखरेखीखाली असणार्‍या व्यक्तींना वाचावयास मिळाणार आहेत.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी, आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकरी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे हा पुस्तकांचा संच वाटपासाठी देण्यात आला. स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन श्री. द्विवेदी यांनी या पुस्तकांचे वितरण केले.
नगर तालुका वैद्यकीय अधिकारी आणि पारनेर तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांकडे ही पुस्तके जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सुपूर्त करून वाटपासाठी दिली.
संस्थात्मक देखरेखीच्या (इन्स्टि़ट्युशनल क्वारंटाईन) कालावधीत हा विचारांचा वसा या व्यक्तींपर्यंत पोहोचावा, त्यांचा तेथील कालावधी चांगल्या प्रकारे व्यतीत व्हावा, यासाठीचा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.  

Post a Comment

0 Comments