Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लॉकडाऊन काळात जमा केलेल्या दुचाकी वाहने परत द्यावी ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१२- लाँकडाऊन काळात पोलीसांनी नगर शहरात पकडून ठाण्यात जमा करण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या जिल्हा प्रशासनाने परत देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद समवेत अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य सचिव अतार खान, कलीम शेख, आसिफ शेख आदींनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लॉकडाऊन काळात शहरांमध्ये दुचाकी गाड्या भाजीपाला, किराणामाल खरेदी करण्याकरिता फिरत असताना पोलिसांनी सदर दुचाकी गाड्यांवर कार्यवाही करून जप्त करून ताब्यात घेतलेले आहे. तरी सदरचे लॉकडाऊन काही भागात शिथिल करण्यात आलेले आहेत. यामध्ये गोरगरिबांचे दुचाकी गाड्या होत्या. आज काम धंद्यावर कंपनीमध्ये जाण्याकरिता व त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी सदर गाडीची अत्यंत आवश्यकता आहे कारण त्यावरच सदरील गोरगरिबांचे पोट आहे तसेच सदर लोकांना बऱ्याच लांब अंतर कापून शेतमाल आणावा लागतो तसेच बरेच लोक हे औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार असल्यामुळे त्यांना दैनंदिन कामकाजात करिता जाणे-येणे करिता दुचाकी वाहनाची अत्यंत आवश्यक आहे तसेच लॉकडाऊन काळामध्ये उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्यामुळे संबंधितांना कुठलेही उत्पन्न झालेले नाही. त्यामुळे त्यांची दंड भरण्याची आर्थिक कुवत नाही त्यामुळे संबंधितांवर दया दाखवून सदरील जमा केलेल्या दुचाकी वाहने जनहितार्थ ज्यांच्या त्यांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदनात करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments