Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील टेल पर्यंतच्या सर्व गावांना पूर्ण दाबाने सिंचन


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.१० : येथे मुळा उजवा कलव्यावरील उन्हाळा हंगाम आवर्तन संबंधी रविवारी (दि.१०) नगर-औरंगाबाद रोडवरील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत उन्हाळी हंगाम आवर्तन -1 सध्या सुरू असून या आवर्तनात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टेल पर्यंतच्या सर्व गावांना पूर्ण दाबाने सिंचन करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

उन्हाळी आवर्तन-2 याचे नियोजन करण्यात आले असून आवर्तन टेल टू हेड करण्यात येणार आहे. या बैठकीस मंत्री शंकरराव गडाख, मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे पाटील, शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिक राजळे, माजी आमदार पांडुरंग अभंग , बापूसाहेब पाटेकर मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगळे, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, मुळा पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता भापकर, राजगुरू आदी अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments