आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २१- खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळा (लॅब) यांनी कोव्हीड - 19 च्या अनुषंगाने नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेस पाठविताना इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आय.सी.एम.आर.)ने दिलेल्या निर्देशांचे आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अहमदनगर जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तसेच SARI व कोरोना सदृष्य लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तींची नमुने तपासणीसाठी आय.सी.एम.आर., नवी दिल्ली यांचेमार्फत निदान व तपासणीची परवानगी देण्यात आलेल्या आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या रुग्णांचे / व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त होईपावेतो संस्थात्मक विलगीकरण (Institutional quarantine) करण्यात येते. तपासणी अहवालानूसार कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना अलगीकरण कक्षात भरती करुन त्यांचेवर पुढील उपचार करण्यात येतात. मात्र, जिल्हयातील काही रुग्णालये / प्रयोगशाळा (लॅब) जिल्हा प्रशासनास न कळविता परस्पर त्यांचे स्तरावरुन नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच नकारात्मक तपासणी अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांच्या संस्थात्मक विलगीकरण व कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना अलगीकरण कक्षात भरती करण्याबाबत योग्य ती दक्षता घेत नसल्याचे तसेच आरोग्य विभागास सदर रुग्णांची माहिती कळविणे बंधनकारक असतांना देखील माहिती कळवत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.
त्यामुळे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खाजगी रुग्णालये / प्रयोगशाळा (लॅब) यांना कोव्हीड - 19 च्या अनुषंगाने नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेस पाठविणेबाबत जिल्हा प्रशासनाने त्यांना सुचनांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशीत करीत आहे.
यामध्ये, खाजगी प्रयोगशाळा (Labs) यांनी कलेक्शन सेंटर / क्लिनिक / रुग्णालयामधेच कोव्हीड -19 निदान व तपासणीसाठी नमूने घ्यावेत. आय.सी.एम.आर.,नवी दिल्ली यांचेकडील आदर्श मार्गदर्शक तत्वांनूसारच कोव्हीड-19 तपासणीसाठी नमूने घ्यावेत.आय.सी.एम.आर.ने कोव्हीड - 19 निदान व तपासणीसाठी मान्यता देण्यात आलेल्या प्रयोगशाळांकडेच नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत.
खाजगी रुग्णालये / क्लिनिक / प्रयोगशाळा (लॅब) यांनी कोव्हीड - 19 चे अनुषंगाने तपासणीसाठी पाठविलेल्या नमून्यांचा CIF फॉर्म व दैनंदिन अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर यांचेकडे सादर करावेत. प्रयोगशाळेकडून नमूने तपासणी अहवाल प्राप्त होईपावेतो रुग्णांना / व्यक्तींना तहसीलदार तथा घटना व्यववस्थापक (Incident Commandar) यांचेशी संपर्क साधून संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येवू नये.
तपासणी अहवालानूसार कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलेल्या रुग्ण / व्यक्ती यांना जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर यांचेशी संपर्क साधून तात्काळ अलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात यावे. तपासणी अहवाल नकारात्मक आलेल्या रुग्ण / व्यक्ती यांना जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर यांचेशी संपर्क साधून तात्काळ संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0 Comments