Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नेप्ती उपबाजार रोज संध्याकाळी ६ ते रात्री १२ वेळेत सुरू राहणार

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२९ : मा. खा. कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर च्या नेप्ती उपबाजार येथे दि. २९ मे २०२० पासून भाजीपाला आणि फळांचे लिलाव शेतकरी व खरेदीदार यांचे आग्रहास्तव रोज संध्याकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सुरू राहणार आहेत. दररोज सकाळी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत सुध्दा भाजीपाला व फळे विक्री नेप्ती उपबाजार येथे सुरू राहील. हा निर्णय समितीचे सभापती अभिलाष घिगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 


शेतकरी, व्यावसायिकांच्या आग्रखातीर हा निर्णय समितीच्या गुरुवारी दि. २८ मे रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. समितीने घेतलेल्या निर्णयामुळे ऐन तपत उन्हाळ्यात रात्रीची शेतकऱ्यांना विकण्याची व खरेदीदारांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जास्तीत जास्त शेतमाल शेतकऱ्यांनी नेप्ती उपबाजार येथे विक्रीसाठी आणावा. जास्तीत जास्त खरेदीदरांनी सायंकाळी होणाऱ्या लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.


Post a Comment

0 Comments