Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फेसबुकवर सैराट फेमच्या नावाने बनावट अकौऊंट बनवून महिलांना गंडा ; आरोपी अटक, सायबर क्राईम विभागाची कारवाई

  

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२५- फेसबुकवर सैराट फेम आकाश ठोसर (परश्या) यांच्या नावाने बनावट अकौऊंट तयार करून अहमदनगर शहरातील महिलांना गंडा घालणारा सायबर पोलीसांनी केला जेरबंद केले आहे. शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय २५, रा.मोहननगर, मंगल आर्केट सो.प्लाँट नं.७ पिंपरी, पुणे) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, फेसबुकवर सैराट फेम आकाश ठोसर (परश्या) यांच्या नावाने बनावट अकौऊंट तयार केले. फेसबुकद्वारे मैत्री केली. यानंतर विश्वास संपादन करीत, सोन्याचे मंगळसूत्र व हातातील अंगठी असे सोन्याचे ५ ताळे वजनाचे १ लाख ४० हजार रु.चे घेऊन, परत करतो असे सांगून, फसवणूक केली, अशी फिर्याद सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तांत्रिक तपास करीत असताना, आरोपी हा पिंपरी, पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी पुणे येथे जाऊन तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून आरोपी चव्हाण याला पकडले. यावेळी पोलिसांनी खाक्या दाखविताच, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पो.नि.अरुण परदेशी यांच्या पथकातील पोसई प्रतिक कोळी, पोहेकाँ योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोना मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, राहुल हुसळे, पोकाँ अरुण सांगळे, भगवान कोंडार, अमोल गायकवाड, चापोहेकाँ वासुदेव शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments