Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारे जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी दि.२० - शिर्डी जवळच असणाऱ्या रांजणगाव देशमुख येथून चोरी गेलेली महिंद्रा पिकअपजीपचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगर यांनी लावला असून ही जीप चोरी करणारे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,द. 17 मे रोजी रात्री एक वाजता साकीर जाकिर इनामदार हा सोनू नजीर शेख व दीपक प्रभाकर सावंत यांच्याबरोबर महिंद्रा पिकअप जीप नंबर एम एच 45/ 93 52 यामध्ये डिझेलचे बॅरल घेऊन रांजणगाव देशमुख येथे हे समृद्धी महामार्ग साठी लागणाऱ्या खडी क्रेशर ला डिझेल देऊन परत संगमनेर कोपरगाव रोडने देर्डे-कोऱ्हाळे तालुका कोपरगाव येथे येत असताना रांजणगाव परिसरात एमएसईबी सबस्टेशनजवळ उमेश तान्हाजी वायदंडे रा,गणेशनगर यांच्या सांगण्यावरून आकाश दीपक गायकवाड ( वय 20 रा. लक्ष्मीनगर शिर्डी) तसेच संदीप दिलीप रजपूत (रा. बाभळेश्वर) व आणखी एक लहान मुलगा यांनी पाठीमागून दोन मोटरसायकलवर येऊन ही महिंद्रा पिकअप अडवून या जिपमधील व्यक्तींना मारहाण करून धाक दाखवून खाली उतरून त्यांच्याकडील दोन मोबाईल व पिकअप जीप व ATM असाएकूण मुद्देमाल दोन लाख 65 हजार रुपयाचा चोरून नेला होता, यासंदर्भात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह व श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सह त्यांच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख ,गणेश इंगळे, मोहन गाजरे, मनोहर गोसावी, बाळासाहेब मुळीक शंकर चौधरी, विशाल दळवी रवींद्र कर्डिले ,रवींद्र सोनटक्के, भागिनाथ पंचमुख, ज्ञानेश्वर शिंदे प्रकाश वाघ, संदीप चव्हाण विजय धनेकर ,संभाजी कोतकर व सचिन कोळेकर यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. विविध पथकामार्फत हा तपास करण्यात आला, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने या गुन्ह्याचा तपास करून उमेश वायदंडे ,आकाश दीपक गायकवाड, संदीप दिलीप रजपूत व एका लहान मुलाला अटक केली आहे व चोरी गेलेला मुद्देमालासह या चोरीसाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत, अधिक तपास पोलिस करीत आहे,
शिर्डी व परिसरातून वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहे, त्याचप्रमाणे शिर्डी व परिसरात मोटरसायकली व कार जाळण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे ,त्याचे आरोपी अद्याप. सापडलेले नाहीत, तरी अ,नगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments