Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुकुंदनगराच्या ५ जणांवर जमावबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी भिंगार कँम्प ठाण्यात गुन्हा दाखल


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.२ : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाँकडाऊन असतांना जमावबंदीचे उल्लंघन करून विनापरवाना केळी वाटप करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी भिंगार कँप पोलिसांनी मुकुंदनगरमधील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना व्हायरस रोगाचे अनुशंगाने कोरोना कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता मुकुंदनगर येथे गस्त घालत असतांना फैयाज आजिजउद्यीन शेख, फरान फैयाज शेख,अर्शद आयुब शेख, अरीफ सय्यद शेख,तोसिफ शेख सर्व रा. मुकुंदनगर,हे जमावबंदीचे उल्लंघन करुन विनापरवाना केळी वाटप करतांना आढळून आले.
याप्रकरणी सपोनि प्रविण पाटील यांनी पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंग अप्पर पोलिस अधिक्षक सागर पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
पोलिस कर्मचारी सचिन धोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदनगर मधील केळी वाटप करणाऱ्या पाचजणांविरूध्द कँप पोलिसांनी भादंवि कलम १८८,२६९,२७०,२९० सहकलम३७(१)(३)भारतीय साथरोग अधिनियम १८९७चे कलम २,३,४,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments