Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रात शुक्रवारापासून लालपरी धावणार ; एसटी महामंडळाने घेतला निर्णय



रेड झोन नसलेल्या 
जिल्ह्यांतर्गतच सुरू राहणार
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई दि.२१- राज्यात लाँकडाऊनच्या काळात बंद एसटी महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ही सेवा केवळ रेड झोन नसलेल्या जिल्ह्यांतर्गतच सुरू राहणार आहे. मुंबई-पुण्यातून पायी निघालेल्या श्रमिकांसाठी आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी एसटी बस सुरू करण्याबाबतचा निर्णय झाला नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
वाहतुकीची सुविधा नसल्याने मुंबई-पुण्यातील हजारो श्रमिक पायीच आपल्या जिल्ह्यांकडे निघाले आहेत. आंतरजिल्हा प्रवास मुभा नसल्याने चौथ्या लॉकडाउनमध्ये श्रमिकांचे हाल कायम आहेत. कोणत्या मार्गावर फेऱ्या चालवणे आवश्यक आहे. याबाबत महामंडळाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठविले आहेत. या दोन्ही प्रस्तावांवर विचार करून त्यानुसार मर्यादित स्वरूपात गाड्या सोडण्याचे नियोजन असणार आहे. मुंबई-पुण्यातून एसटी धावणार नाही, हेही महामंडळाकडून सांगितले आहे. 
रेड झोन नसलेल्या ठिकाणी शुक्रवार (दि.२२) पासून धावणाऱ्या एसटी बसमध्ये आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना मुभा असणार आहे. तिकीट काढून सर्वसामान्यांना या बसमधून प्रवास करता येईल. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच या बस सुरु होणार असल्याचे महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments