Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यपद निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई दि.१८ : विधानपरिषद सदस्य म्हणून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. छायाचित्रात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार असून

त्यांनी सदस्यत्वाची घेतली शपथ घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदार झाले असुन मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषदेच्या इतर नवनिर्वाचित आमदारांनीही आज सदस्यत्वाची शपथ घेतली.
आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. आज शपथविधीची प्रक्रिया फक्त १० मिनिटातच पार पडली.
विधानपरिषद निवडणुकीत अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
१३ उमेदवारांपैकी डॉ.अजित माधवराव गोपछडे - भाजप, संदीप सुरेश लेले - भाजप, किरण जगन्नाथ पावसकर - राष्ट्रवादी काँग्रेस, शिवाजीराव यशवंत गर्जे - राष्ट्रवादी काँग्रेस या चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध सदस्य याप्रमाणे शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे
राष्ट्रवादी काँग्रेस -शशिकांत जयवंतराव शिंदे, अमोल रामकृष्ण मिटकरी
काँग्रेस -राजेश धोंडीराम राठोड
भाजप - गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड

Post a Comment

0 Comments