Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे: नगरसेवक गणेश भोसले


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : कोरोना संसर्ग विषाणूच्या संकटकाळात प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याबरोबर आपल्या देशावर एक आर्थिक संकट ओढावत चालले आहे. हा विषाणू लवकरात लवकर थांबला नाही तर प्रत्येक नागरिकाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपआपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडून शासननियमांचे पालन करावे. महापालिकेचे सफाई कर्मचारी कोरोना संसर्ग विषाणूच्या प्रादर्भावातही आपला जीव धोक्यात घालून दैनंदिन सफाईचे काम चोखपणे पार पाडत आहेत. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन नागरिकांचे आरोग्यास महत्व देऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आज आरोग्य दिनानिमित्त प्रभाग क्र. १४ मधील सफाई कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोज, साबण, मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटायझर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तरी प्रत्येकानेसफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन नगरसेवक गणेश भोसले यांनी व्यक्त केले. 
आरोग्यदिनानिमित्त प्रभाग क्र. १४मधील मनपा सफाई कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोज, साबण, मास्क, हॅण्डवॉश, सॅनिटायझर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय कर्डिले, सुरेश पुंड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, मनपा सफाई कर्मचारी दररोज शहराची स्वच्छतेची कामे करत असतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगल्यास राहण्यास मदत होते. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वाट मोलाचा आहे.

Post a Comment

0 Comments