Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निजामुद्दीन कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी


नागरिकांनीही अशा व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला द्यावी
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. ०६- जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे आतापर्यंत ६७६ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ६१८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर २१ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत.सध्या अजून ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती जिल्ह्यात असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच, नागरिकांनीही अशा व्यक्ती माहित असतील तर त्यांनी अशी नावे जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेला कळवावित, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 
दरम्यान, ज्या- ज्या भागात बाधित रुग्णाचे वास्तव्य होते, त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलत तो परिसर संपूर्ण सील केला आहे. तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय येथे आणून त्यांची तपासणी केली जात आहे. तेथील नागरिकांनीही त्या परिसराच्या बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिथे अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहेत.
बाधित २१ रुग्णापैकी १८ बाधित रुग्ण हे तबलिख जमातशी संबंधित आणि तेथे जाऊन बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात तब्लीख जमातशी संबंधित ८३ नागरिकांना शोधून काढले, त्यात २९ परदेशी नागरिकांचा सहभाग होता. तेथे थेट सहभाग असलेले ०६ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. २१ बाधित रुग्णांच्या पैकी ०२ व्यक्तींचे १४ दिवसांनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यांना अजुन १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments