Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रवरा परिवाराकडून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना युद्धं साठी दिले जाणार सॅनिटायझर - खा. डॉ. सुजय विखे पाटील

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जगभरात आणि देशात कोरोना ने हाहाकार माजला आहे लोक डाउन जनता कर्फ्यू यासारख्या विविध उपाय योजना तून नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना विरुद्धची लढाई यशस्वीपणे लढत आहेत. महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर, वॉर्ड बॉईज, आरोग्य खात्यातील कर्मचारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्य हे लढाईमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून जर हे करून आतील योद्धे सुरक्षित राहिले की ही लढाई आपण जिंकू. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या या लढाईमध्ये प्रवरा परिवाराकडून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, महसूल व पोलिस प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर पुरवण्याची व्यवस्था केली जाणार आहे अशी माहिती खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी दिली.
अहमदनगर महानगरपालिकेला प्रवरा परिवाराच्या वतीने सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले, त्यावेळेस ते बोलत होते. डॉ. सुजय विखे पा. यांनी कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर प्रवरा परिवाराच्या माध्यमातून यापूर्वी सुरु केलेल्या टोल फ्री क्रमांकावर आलेल्या सूचनांचा विचार करून व लोकांच्या मागणी आणि गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला शक्य होईल तितके आणि प्रवरा परिवाराच्या मदतीने आपण या लढाईमध्ये योगदान देत आहेत. मुळा प्रवरा सोसायटीच्या वतीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. या दरम्यान, खा. डॉ. सुजय विखे पा. म्हणाले की, कोरोना विरुद्ध च्या लढाईमध्ये सामान्य माणसं सामान्य माणसांपर्यंत धान्य पोहोचवणे त्यांचे भुकेची चिंता मिटवणे, सील केलेल्या भागांमध्ये धान्यपुरवठा बरोबरच या लढाईमध्ये पोलीस प्रशासन, महसूल कर्मचारी, आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी प्रवरा परिवाराकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक युद्धाला सॅनिटायझर दिले जाणार आहेत त्याचबरोबर भविष्य काळामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर संपर्क साधून आणि प्रवरा परिवार स्वतः करून आवश्यक ते पीपी किट उपलब्धतेबाबत सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments