आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अहमदनगरला जातीयतेढ निर्माण करणारं स्टेटस व्हॉट्सअॅपवर ठेवल्याने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहावे लागले आहे. पोलिसांनी स्वत:हून ही कारवाई केली. जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा नगर शहरात नोंदविला गेला आहे.
आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेला 'शेख' जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. पीर महंमद बादशाह शेख (रा. शेंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. शेख हे जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागात नोकरीला आहे. जातीय तेढ निर्माण होईल या हेतुने चुकीची अफवा पसरविल्याचा आरोप शेख विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला आहे.
0 Comments