Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लॉकडाऊन कालावधीत एआरटी औषधे तालुकास्‍तरावरील लिंक सेंटरला उपलब्‍ध


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि. 8 –  जिल्‍हा रुग्‍णालयातील  जिल्‍हा एडस नियंत्रण व प्रतिबंधक विभागामार्फत  एचआयव्‍हीसह जीवन जगणा-या व्‍यक्‍तींना  नियमित न चुकता एआरटीची औषधे द्यावी लागतात. लॉकडाऊन कालावधीत ही औषधे या रुग्णांना वेळेवर मिळावीत, यासाठी ही औषधे नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड,  कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, राहुरी व श्रीरामपूर तालुक्‍याच्‍या ठिकाणी असणार्‍या लिंक एआरटी सेंटरमध्‍ये औषधे उपलब्ध करुन देण्‍यात आली आहेत. रुग्‍णांनी घाबरुन न जाता आपल्‍या परिसरातील  लिंक एआरटी सेंटरमधून औषधे घ्‍यावीत. तसेच औषधासंदर्भात कोणतीही अडचण असल्‍यास विहान काळजी व आधार केंद्र अहमदनगर(  मो.9822131062 व 9511291919 )  व एआरटी केंद्र अहमदनगर (दूरध्‍वनी क्रमांक 0241-2430761) वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी केले आहे.
ही औषधे जिल्‍हा रुग्‍णालय,अहमदनगर व प्रवरा ग्रामीण रुग्‍णालय, लोणी  ता. राहाता येथे उपलब्‍ध आहेत. सध्‍या देशात कोरोना साथीच्‍या पार्श्‍वभूमीवर महाराष्‍ट्रात संचारबंदी लागू केल्‍याने वाहतूक यंत्रणा बंद असल्‍यामुळे नियमित औषधे नेण्‍यासाठी  रुग्‍णांची गैरसोय होत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. या रुग्‍णांची गैरसोय  टाळण्‍यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशानुसार ही व्यवस्था केल्याचे जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी सांगितले.Post a Comment

0 Comments