आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत लॉक डाऊनच्या काळात आता महत्त्वाच्या ठिकाणी व गर्दी होण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी प्रथमच ड्रोन कॅमेरा द्वारे पाहणी करण्यात येणार असून नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे. सर्व बंद आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ठप्प आहे , कोणालाही विनाकारण शहरात संचार करायला बंदी आहे, असे असतानाही काही लोक नियम तोडून फिरत असतात, अशांवर यापूर्वीही अनेकदा नजर ठेवण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे, मात्र नजर चुकवून असे काही लोक फिरत असतातच, उगाच काहीतरी बोगस कारण सांगून इकडून तिकडे फिरत असतात किंवा किराणा दूध भाजीपाला, मेडीकल घेण्यासाठी अशा दुकानात सोशल डिस्टेंस न पाळता गर्दी करतात, विनाकारण कोणतीही दक्षता न घेता व नियम न पाळता गर्दी करत असतात, अनेकदा पोलीस आहे, तोपर्यंत सर्व नियम पाळले जातात, परंतु पोलीस व्हॅन निघून जाताच परत जैसे थी परिस्थिती तेथे होत असते, यावर आता नियंत्रण मिळवण्यासाठी शिर्डी पोलिसांनी पोलीस उप,अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दीपक गंधले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत खाजगी ड्रोन कॅमेरा द्वारे पाहणी करण्यात येणार आहे,
शिर्डीतील श्रीरामनगर, साईश कॉर्नर, कालिकानगर, बस स्टॅन्ड, नगर मनमाड महामार्ग अशा गजबजलेल्या ठिकाणी व भाजीपाला मार्केट अशा ठिकाणी ड्रोन द्वारे कॅमेऱ्याने वरून पाहणी होणार असून जर कोणी लॉकडॉऊन काळात नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसल्यास अशा लोकांवर कडक कारवाई होणार आहे ,
जेथे गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी आता शिर्डीत ड्रोन द्वारे प्रथमच निरीक्षण केले जाणार आहे, यापूर्वीही शिर्डीत पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत नगर मनमाड रस्ता व इतर रस्त्यांवर नाकाबंदी करून ठीक ठिकाणी बॅरिकेड्स लावून टारगट तरुणांच्या वर कारवाई केली, मोटरसायकली जप्त केल्या, मात्र शिर्डीतील काही ठिकाणी पोलीस व्हॅन निघून गेल्यानंतर परत लोक किराणा ,दूध ,भाजीपाला, मेडिकल घेण्याचे कारण दाखवून उगाच फिरत असतात, अश्या नियम तोडणाऱ्या,व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर आता शिर्डीत ड्रोन कॅमेरा द्वारे नजर ठेवली जाणार आहे व नियम तोडणाऱ्या कडक कारवाई केली जाणार आहे, तरी या काळात सर्वांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये , आपापल्या घरात सुरक्षित राहावे, असे आवाहन शिर्डी पोलीसांनी केले आहे,
शिर्डी प्रमाणेच शिर्डी परिसरातही या अशा टारगट तरुणांचा उपद्रव वाढला आहे, रात्री मोटरसायकलवर इकडून तिकडे फिरताना आसपासच्या गावांमध्ये ते दिसतात, या काळात सर्वत्र बंद असल्यामुळे व शिर्डीत कडक बंदोबस्त असल्यामुळे शिर्डीतील व शिर्डी परिसरातील टारगट शिर्डी परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये विनाकारण फिरत असतात, अशांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे ,असे शिर्डी परिसरातील नागरिक बोलत आहेत.
0 Comments