Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार कँप पोलिसांमुळेच मकरजमधील कोरोना उघड ; सामाजिक संस्था करणार पोलिसांचा सन्मान

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर - दिल्लीतील निजामुद्यीनच्या तबलिगी जमात मरकज मधून नगरच्या मुकूंदनगरमध्ये आलेले कोरोनासंसर्ग लोक भिंगार कँप पोलिसांच्या दक्षतेमुळे उघडकीस आले.यामध्ये काही विदेशी नागरिक मिळून आले. यानंतर मरकज मधील सहभागी झालेल्यांचा शोध सुरू झाला.या कारवाई बद्दल भिंंगार कँप पोलिसांना नागरिक धन्यवाद देत असून जनजीवन सुरळीतपणे सुरू झाले की सामाजिक संस्था त्यांचा सन्मान करणार आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दि.२२मार्च रोजी जनता कर्फ्यू घोषणा केली.त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य लाँकडाऊन केले.नंतर अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू केली कँप पोलिसांनी आपल्या हद्दीत बंदोबस्त लावला.यावेळी मुकूंदनगर मधील नागरिक लाँकडाऊन व संचारबंदी चे पालन करीत नसल्याने व सांगूनही ऐकत नसल्याने त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले.यावेळी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन याभागात चौकशी सुरु केली.येथील दोन ठिकाणी तबलिगी जमातचे लोक वास्तव्यास असल्याचे समजले.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील व नगर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना ही माहिती देण्यात आली.यांच्या मार्गदर्शनाखाली कँपचे सपोनि प्रविण पाटील पो काँ सचिन धोंडे, पो.ना सुद्रीक व इतर पोलिस कर्मचारी यांनी दि.३०मार्च रोजी मेहराज हाईटस या इमारतीतून ११ विदेशी नागरिकांसह या मशीदचे विश्वस्त ताब्यात घेतले.
याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सचिन धोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदनगर मधील मेहराज मशीदचे विश्वस्त फिरोज वालेखान पठाण,शेख युनूस चाँद,अब्दुल सय्यद खोकर या सह ११ विदेशी नागरिकांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक १६८/२०२० भादवी कलम १८८,२६९,२७० महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७(१)(३)/१३५सह कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ चे कलम २,३,४ निर्गमित केलेल्या आदेशाचे उलघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासर्वाची आरोग्य तपासणी केली असता यामध्ये काहीजण कोरोना बाधित निघाले.त्यामुळे यांची कसून चौकशी केली असता ते दिल्लीतील निजामुद्यीन पबलिगी जमात मरकज येथून आल्याचे समजले.या लोकमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. याची खात्री पटल्याने राज्यात वरिष्ठ पातळीवर त्वरित दखल घेण्यात आली.राज्याच्या अहवालाने दिल्ली देखील हादरली.यानंतर केंद्रीय गुप्तचर खात्याने दिल्लीच्या मरकज उघड केले.कँप पोलिसांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलिस खात्याची मान उंचावली आहे.पोलिसांनी आपली कार्यतत्परता दाखवली. यामुळेच आज हजारो लोक कोरोनाच्या संसर्गापासून वाचले.अन्यथा आज आपल्याला गंभीर परिणामांना समोरे जावे लागले असते.पोलिसांच्या या कार्याची दखल विविध सामाजिक संस्थांनी घेतली असून कँपचे अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचा उचीत सन्मान करणार आहेत.
शुक्रवारी दि.३रोजी देखील कँप पोलिसांनी तबलिगी जमातीच्या संपर्कात आलेल्या१३जणांना मुकुंदनगर मधून ताब्यात घेतले आहे. यांना आरोग्य तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments