आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव दि 6 - तालुक्यातील हातगाव येथे महिलेच्या झालेल्या छेडाछेड प्रकरणातुन झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या युवराज बाबासाहेब गरड यांचा उपचार सुरू असताना मृत्यु झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी लक्ष्मण तुकाराम अभंग यांच्यासह तिघांना रात्री बीड जिल्यातील येलंब हद्दीतून सापळा रचून पोलिसांनी मोठ्या शिफायतने अटक केली आहे तर संदीप तुकाराम अभंग, योगेश तुकाराम अभंग यांना हातगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील महिलेची झालेल्या छेडछाड बाबत आरोपीस म्हणाले कि तु छेडछाड करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन का केले असे विचारल्याचा आरोपी यांना राग आल्याने आरोपी लक्ष्मण तुकाराम अभंग यांनी संगनमत करुन गैरकायद्याची मंडळी एकत्रित जमवून आरोपीने त्यांचे हातातील तलवार, गजाने लोखंडी फायटर, लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अमोल दिगंबर भराट ( वय २०, रा हातगाव ता शेवगाव) यांनी दिली होती पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. युवराज बाबासाहेब गरड यांना डोक्यास व हात, मांडीवर जबर मारहाण केली होती. जखमींवर अहमदनगर, औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ दमदाटी करुन व तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करतो असा दम दिल्याप्रकरणी अमोल दिगंबर भराट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मण तुकाराम अभंग, संदीप तुकाराम अभंग, अनिल सुनिल मातंग उर्फ काळ्या, प्रकाश सुसे उर्फ भाऊ सुसे, भाउसाहेब देशमुख रिक्षावाला, योगेश जाधव (सर्व राहणार हातगाव ता. शेवगाव) यांच्यावर
शेवगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा गु.र.नं १५२ /२०२० भा.द .वि.क ३०७, ३५४, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अँक्ट ४/२५ प्रमाणे शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र मारहाणीत जबर जखमी झालेले फिर्यादी अमोल दिगंबर भराट, युवराज बाबासाहेब गरड,अंकुश रामेश्वर ज-हाड (सर्व रा हातगाव) यांच्यावर अहमदनगर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. तर युवराज बाबासाहेब गरड यास औरंगाबाद ला हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना युवराज गरड याचा मृत्यू झाल्याने शेवगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. हातगाव येथे जखमी मयत झाल्याने तणावग्रस्त वातावरण होऊन आरोपीस अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा निर्णय गरड कुटुंब व नातेवाईकानी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता आरोपी सापडने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे शेवंगाव पोलीस ठाण्याचे पो.नि.रामराव ढिकले यांनी आरोपी सापडण्याची पथक तयार केले मुख्य आरोपी लक्ष्मण तुकाराम अभंग यास मोठ्या शिफायतेने बीड जिल्ह्यातील येलंब येथे तर संदीप तुकाराम अभंग, योगेश तुकाराम अभंग यांना हातगाव येथून हेड कॉन्स्टेबल आण्णा पवार पोलीस नाईक राजू ढाकणे, नामदेव पवार, बंटी काळोखे, वैजीनाथ चव्हाण यांच्या पथकाने शिफायतेने मुख्य आरोपीस ताब्यात घेतले आहे .
या घटनेचा तपास उपनिरीक्षक विश्वास पावरा, अण्णा पवार हे करीत आहेत या घटनेमुळे हातगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments