आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / राजेंद्र गडकरी
सावळीविहीर - सध्या देशात कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे. लॉक डाऊनला दहा दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरिबांना मदत म्हणून सावळीविहीर येथील राहता तालुका पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील काही कुटुंबांना व गरजू व्यक्तींना श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपात बोलावून रविवारी (दि.५) किराणा वाटप केला.
देशात सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे ,अशा परिस्थितीत लोकांना मदत म्हणून येथील राहता तालुका पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे व त्यांचे सहकारी यांच्याकडून येथील गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आले, डाळ ,साखर, तेल पिशव्यांमधून प्रत्येक व्यक्तीला देण्यात आले, येथील श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपात सर्वांना एकत्रित बोलावून हे किराणा वाटप करण्यात आले, यावेळी गावातील अनेकांनी या मोफत किराणा चा लाभ घेतला, यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश कापसे, बापू जपे निलेश आरणे, कैलास पैसे, रवींद्र पळसे आदींसह कार्यकर्ते व किराणा घेण्यासाठी आलेल्या महिला-पुरुष ,मुले मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
0 Comments