Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राजपत्रित अ. महासंघाचे माजी अध्यक्ष पोकळे यांचे महिन्याचे ४८ हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन व अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांनी दिले ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीलाआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि.५ - कोरोना विषाणूच्या (Covid-19) निर्मूलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष इंजि. मनोहर पोकळे यांनी त्यांचे एका महिन्याचे ४८ हजार २१६ रुपयांचे सेवानिवृत्ती वेतन मुख्यमंञी सहाय्यता निधीस दिले. तर येथील अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांनीही वैयक्तिकरित्या रुपये ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस दिला. 
इंजि. मनोहर पोकळे यांनी त्यांचे फेब्रूवारी-20 चे संपुर्ण सेवानिवृत्ती वेतन 48 हजार 216 रुपयांचा अपर जिल्हाधिकारी श्री. सोरमारे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, राजपञित अधिकारी महासंघाचे राज्य संघटक विठ्ठलराव गुंजाळ आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. सोरमारे यांनी त्यांचा रुपये ५१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील उपस्थित होत्या.      

Post a Comment

0 Comments