Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोशल मीडियावर जातीधर्मात तेढ होणारा अथवा कोरोना रोगाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई होणार : मिटके


कारवाईत ३ वर्षे शिक्षा, १ लाख रुपये दंड
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.५- फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून दोन जातीधर्मात तेढ निर्माण होईल असे, अथवा कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर सायबर क्राईमचे लक्ष असून, तसे कोणी आढळून आल्यास त्या संबधितावर तात्काळ कारवाई केली जाईल अशी माहिती नगर शहर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी दिली.
अहमदनगर शहर उपविभागातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कँम्प ठाणे हद्दीत फेसबुक, व्हाट्सएप अथवा अन्य माध्यमातून संदेश लिहून दोन जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे अथवा कोरोना संसर्गजन्य आजाराबद्दल अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या कारवाई कोणी आढळून आल्यास ३ वर्षे शिक्षा, १ लाख रुपये दंड. भादंविक १५३(ब),२९८,५०५,१०७ प्रमाणे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४० व भादंविक १८८ नुसार आणि महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५२,५४ तसेच भादंविक कलम ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई केली जाईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनेची अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन दिवस-रात्र काम करीत आहेत. देशात लाँकडाऊन असताना काही लोक कोरोना संसर्गजन्य रोगाबाबत सोशल मिडियावर चुकीची माहिती देऊन अफवा अथवा जातीधर्मात तेढ निर्माण होईल, असे संदेश पाठविल्यास त्या संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असे श्री मिटके यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments