Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर बु।। येथे तीन ठिकाणी अचानक आग !


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी दि.३ - नगर -मनमाड महामार्गानजिक असणाऱ्या राहाता तालुक्यातील सावळीविहिर बु।। येथील मार्केटच्या बाजूला अचानक शुक्रवारी (दि.३) आग लागली, परंतु वेळेवर अग्नीशामक बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. या दरम्यान कोणतीही आर्थिक व जिवीतहानी झाली नाही.
सावळीविहीर बु।। सौमय्या हायस्कूल नजिक असणाऱ्या मार्केट दुकानाच्या मागे बंद लक्ष्मीवाडी साखर कारखान्याच्या भिंती शेजारील परिसरात पडलेला कचरा, वाळलेले गवत एकाच वेळेस 3 ठिकाणी पेटून मोठी आग लागली होती. प्रसंगावधान राखत गावातील जागृत नागरिकांनी शिर्डी आग्निशामक विभागाला घटनेची माहिती दिली असता काही वेळेतच अग्निशामकबंब दाखल होऊन आग विझविण्यात आली. या घटनेत कोणत्याही दुकानाचे नुकसान झाले नाही, परंतु यावेळी स्थानिक नागरिकांमध्ये ही आग समाज कंटकांकडून लावण्यात आल्याची चर्चा होती. 

Post a Comment

0 Comments