Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री रामनवमी उत्सवाची आज श्री साईबाबांची व श्रीरामाची धार्मिक पूजाअर्चा करून उत्साहात सांगता


 
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर /राजेंद्र गडकरी
शिर्डी दि.३ - शिर्डीत शुक्रवारी सकाळी साडेचार वाजता श्री साईबाबांची काकड आरती, होऊन नंतर मंगलस्नान झाले. त्यानंतर सहा वाजता शिर्डी माझे पंढरपुर आरती होऊन सहा वाजून 15 मिनिटांनी श्री साईबाबा संस्थान चे प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शोभाताई गमे यांच्या हस्ते श्री साईंची पाद्यपूजा करण्यात आली. तसेच सकाळी सात वाजता श्री गुरुस्थान मंदिरात साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अंजली डोंगरे यांच्या हस्ते श्री रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी दहा वाजता श्री साई समाधी मंदिरात मंदिराचे पुजारी उल्हास महाराज वाळुंजकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन दुपारी बारा वाजता दहीहंडी फोडून गोपाळकाला करण्यात येऊन या तीन दिवस चाललेल्या शिर्डीतील श्री रामनवमी उत्सवाची आज श्री साईबाबांची व श्रीरामाची धार्मिक पूजाअर्चा करून उत्साहात सांगता झाली.
कोरोनामुळे सध्या देशात मोठी आपत्तीजनक परिस्थिती असल्यामुळे व कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर लॉक डाऊन असल्यामुळे यावर्षीची रामनवमी शिर्डीत अगदी साध्या पद्धतीने व गर्दी न करता शांततेत व फक्त धार्मिक विधी, पूजाअर्चा, परंपरे प्रमाणे करत तीन दिवस चाललेला ह्या श्रीरामनवमी उत्सवाची आज उत्साहात सांगता झाली.
दरवर्षी श्री रामनवमीला शिर्डीमध्ये सन 1911 पासून मोठा उत्सव भरतो. श्री साईबाबा हयात असताना त्यांनी श्रीराम जन्मोत्सव परंपरा सुरू केली होती तेव्हापासून हा उत्सव आजतागायत मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम करुन साजरा होत आहे. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट व त्यामुळे देशभर असलेला लॉक डाऊन व याच काळात आलेली श्रीरामनवमी, त्यामुळे शिर्डीत श्रीरामनवमी उत्सव अगदी शांत शांत पण धर्मिक विधी परंपरेप्रमाणे करत श्री साई संस्थान ने तो साजरा केला, जरी शिर्डीत दरवर्षाप्रमाणे यावर्षी शेकडो साई पालख्या, हजारो पदयात्री लाखो साईभक्त साईरथ,वाहने मोठी गर्दी नव्हती, शिर्डी ठप्प होती, सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद होते, मंदिरही साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते, तरी मंदिरात श्री साई संस्थान तर्फे रामनवमी उत्सव गर्दी न करता व काेरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून व लॉक डाऊन चे सर्व नियम पाळत विधीवत दरवर्षाप्रमाणे विधिवत पूजाअर्चा करून साजरा केला गेला ,पहिल्या दिवशी श्री साईंची व श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन करून पहिल्या दिवशी श्री द्वारकामाई मंदिरात श्री साई सतचारित्रा चे अखंड पारायण प्रारंभ करण्यात आला. दिवसभर नित्याच्या पूजाअर्चा करण्यात आल्या. श्री रामनवमीच्या मुख्य दिवशी गुरुवारी पहाटे श्री साईंची काकड आरती, मंगल स्नान त्यानंतर श्री द्वारका माई मंदिरातील अखंड श्री साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाची सांगता झाली, सांगता झाल्यानंतर श्री साई प्रतिमा व ग्रंथाची टाळ-मृदुंग च्या निनादात श्री द्वारका मैथुन मिरवणूक काढत श्री गुरुस्थान मार्गे श्री समाधी मंदिरात आणण्यात आली, या मिरवणुकीत वीणा साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोथी उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तसेच संस्थांचे अधिकारी अशोक आवटी व किचवे यांनी श्री साई प्रतिमा धरली होती, मोजके अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत ही मिरवणूक श्री साई समाधी मंदिरात आल्यानंतर पूजन करण्यात आले. त्यानंतर शिर्डी माझे पंढरपुर आरती होऊन श्री अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली डोंगरे यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली, त्यानंतर लेंडी बागेतील शताब्दी ध्वज बदलण्यात आला, तसेच नवीन गव्हाच्या पोत्याची पूजा करून ते द्वारकामाईत ठेवण्यात आले, दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, मंदिरात पाळणा बांधून श्रीरामाची प्रतिमा ठेवून झोका देत श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला, आज श्रीराम नवमीची सांगता होती, आज सकाळी पहाटे श्री साईंची काकड आरती व मंगल स्नान झाले, त्यानंतर श्री समाधी मंदिरात शिर्डी माझे पंढरपुर आरती मंतर साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे व सौ शोभाताई गमे यांच्या हस्ते श्री साई समाधीची पाद्यपूजा करण्यात आली तसेच गुरुस्थान मंदिरात सही संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अंजली डोंगरे यांच्या हस्ते रुद्रभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर समाधी मंदिरात उल्हास वाळुंजकर यांचे काल्याचे किर्तन होऊन दहीहंडी फोडून गोपाळकाला करण्यात आला व या तीन दिवस चाललेल्या उत्सवाची गोपाळकाला झाल्यानंतर विधिवत व उत्साहात सांगता झाली. यावर्षी श्रीराम नवमी उत्सव साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फक्त धार्मिक कार्यक्रम करत श्रीरामनवमी उत्सव साजरा झाला. यावर्षी शिर्डी ग्रामस्थांनीही अगोदरच रामनवमी उत्सवासाठी एक कमिटी बनवली होती व श्रीरामनवमी उत्सवाच्या या तीन दिवसात येथे तमाशा,सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्या, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र लॉक डाऊनमुळे सर्व कार्यक्रम व यात्रा रद्द करण्यात आली होती. शिर्डीत सर्वत्र लॉक डाऊन मुळे शुकशुकाट पाहायला मिळत होता, काकड आरती मंगल स्नान शिर्डी माझे पंढरपुर पाद्यपूजा असे विविध कार्यक्रम नित्याप्रमाणे होऊन मंदिरात दहीहंडी बांधून गोपाळकाला झाल्यानंतर या उत्सवाची विधीवत व उत्साहात सांगता झाली या रामनवमी उत्सव साठी शिर्डी ग्रामस्थ एक कमिटी स्थापन करून यापूर्वीच येते विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु लॉक डाऊन मुळे सर्व कार्यक्रम तमाशे, कुस्त्या व यात्रा रद्द करण्यात आली होती ,शिर्डी श्रीराम नवमी उत्सव असतानाही लॉक डाऊन चे सर्व नियम पाळण्यात आले होते. त्यामुळे शिर्डीत शुकशुकाट दिसत होता, परिसरातील लोकांनी आपापल्या घरात राहून श्री रामाचे ,श्री साईंचे प्रतिमेचे पूजन करून घरीच हा उत्सव साजरा केला ,अनेकांनी घरीच श्री साई स्तवन मंजिरी ,आरती करून मनोभावे श्रीराम नवमी उत्सव आपापल्या घरीच कुटुंबासमवेत साजरा केला व कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, म्हणून श्री रामांना व श्री साईनाथांना मनोमन साकडे घातले,दिसून येत होते.Post a Comment

0 Comments