Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहर पोलिसांतर्फे डोंबारी समाजातील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३ - अहमदनगर शहर पोलिस दलाच्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे डोंबारी समाजातील बांधवांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी शुक्रवारी (दि.३) डोंबारी बांधवांना उपजीविकेसाठी गहू,तांदूळ,तेल, दाल व इतर किराणा, जीवनावश्यक वस्तू साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी अहमदनगर शहर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, अहमदनगर शहर पोलिस दलचे पो.नि. महाजन, स्वयंसेवी संस्थेचेचे हरजीत वधवा, प्रशांत मुनोत आदीसह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर पोलिस दलाच्या वतीने शहर DYSP श्री. संदीप मिटके यांनी कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन उच्च स्तराचे उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासना तर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कारण शिवाय रस्त्यावर फिरू नये, गर्दी करू नये, प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नये, अहमदनगर पोलिस दलास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.


Post a Comment

0 Comments