Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्राथमिक शिक्षक बँक व एल.आय.सी.कपाती बंदबाबत शिक्षण समितीने फेरविचार करावा ; शिक्षक परिषदेची मागणी

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३०: अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक व एल.आय.सी.कपाती बंदबाबत शिक्षण समितीने फेरविचार करावा अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या आशयाचे निवेदन आज शिक्षक परिषदेने अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य. कार्यकारी अधिकारी शिवराज पाटीलसाहेब व शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांना इमेलद्वारे केले आहे. 

अशा प्रकारची मागणी जि.प. अध्यक्षा राजश्रीताई घुले व उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके व सर्व सन्माननीय सदस्य शिक्षण समिती यांना समक्ष भेटून देखील परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करणार आहोत.शिक्षक बँकेचे सभासद हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. म्हणून जिल्हा परिषद ही शिक्षकांची मातृसंस्था आहे.अशा परिस्थितीत जिल्हा परिषद व शिक्षक बँकेतील संघर्षात बँकेचा हप्ता तहकूब राहील्यामुळे जिल्हयातील कर्जदार ८ ते ९ हजार शिक्षक सभासदांना नाहक अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. तरी यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या दृष्टीने सर्व संघटनांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. बँक जिल्हयातील ११ हजार शिक्षकांची कामधेनू आहे. ती टिकली पाहीजे व वाढली पाहिजे. 
या उद्देशाने शिक्षक परिषद सर्व संघटनासोबत आहे. 
निवेदनावर परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले, उपाध्यक्ष संजय शेळके, राजेंद्र जायभाय , जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे, आर पी रहाणे, राम निकम, श्रीकृष्ण खेडकर, नागेश लगड, संजय म्हस्के,दत्ता गमे, गणेश वाघ,गणपत सहाणे, राजू इनामदार, मिनाक्षी तांबे, शशी सावंत,प्रल्हाद गजभीव, बाळासाहेब मगर, सुनिल पवळे, रविंद्र आरगडे,सुभाष गरूड,मिलींद तनपुरे,तुषार तुपे,कल्याण राऊत,भिमराज उगलमुगले,बाळासाहेब रोहोकले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Post a Comment

0 Comments